शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा शहिदांना सलाम; शूरा आम्ही वंदिले! सैनिकांच्या सन्मानार्थ विशेषांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:00 IST

देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करताना बलिदान दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्यकथा ‘लोकमत’ आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांसमोर आणत आहे. ‘लोकमत’ने आपला वर्धापनदिन विशेषांक शहीद जवान व देशासाठी लढणाऱ्या सर्वच आजी-माजी सैनिकांना अर्पण केला आहे.

अहमदनगर : देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करताना बलिदान दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या शौर्यकथा ‘लोकमत’ आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने वाचकांसमोर आणत आहे. ‘लोकमत’ने आपला वर्धापनदिन विशेषांक शहीद जवान व देशासाठी लढणाऱ्या सर्वच आजी-माजी सैनिकांना अर्पण केला आहे. यानिमित्त ‘लोकमत’ व रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही संस्था शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करणार आहे.स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी लढताना नगर जिल्ह्यातील अनेक जवान शहीद झाले. या सर्व शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘लोकमत’ने आपल्या वर्धापनदिनानिमित्त ‘शूरा मी वंदिले’ या विशेषांकाची निर्मिती केली आहे. या विशेषांकात या शूर वीरांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. विशेषांकातून या शौर्यकथा १४ ते १८ आॅगस्ट या कालावधीत वाचकांच्या भेटीला येणार आहेत.

वर्धापनदिन समारंभात झाडांची रोपे आणण्याचे आवाहन

सालाबादप्रमाणे १५ आॅगस्टला ‘लोकमत’भवनच्या हिरवळीवर सायंकाळी ५ ते ९ या वेळेत ‘लोकमत’चा वर्धापनदिन समारंभ साजरा होणार आहे. या समारंभात कुठल्याही भेटवस्तू आणू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. भेटवस्तूंऐवजी झाडांची रोपे आणावीत. ही रोपे शहीद जवानांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या गावांना भेट देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ राबविणार आहे.

‘रेणुकामाता’ शहिदांच्या कुटुंबीयांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवणार‘लोकमत’च्या ‘शूरा मी वंदिले’ या उपक्रमाचे रेणुकामाता मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांनी स्वागत केले. देशासाठी बलिदान दिलेल्या या जवानांच्या स्मृतींना ‘लोकमत’मुळे उजाळा मिळणार आहे. या जवानांच्या परिवारांची काळजी घेण्याची जबाबदारी समाजाची आहे. त्यामुळे आपण आपल्या संस्थेतील पाच टक्के जागा या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी यापुढे राखीव ठेवणार असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमत