शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

पाणी भरून रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:42 IST

नगरमधील प्रकार; राज्यातही काळाबाजार करणारे अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीरामपूर (जि. नगर) : रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस आले असताना राज्यात मात्र अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगरसह अनेक भागांत याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली. श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. रईस अफजल शेख (रा. मातापूर), असे आरोपीचे नाव आहे.कोल्हापुरात रॅकेट उघडकीसकोल्हापूर : रेमडेसिविर हे अडीच हजार रुपयांचे इंजेक्शन काळ्या बाजारात १८ हजार रुपये किमतीला विकणारे रॅकेट कोल्हापुरात उघडकीस आले. रॅकेटमधील दोघांना मंगळवारी पहाटे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. योगिराज वाघमारे व पराग पाटील, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ११ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आली.औरंगाबादेत काळाबाजार करणारे चौघे कारागृहातऔरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या गुन्ह्यात अभिजित नामदेव तौर, मंदार अनंत भालेराव, अनिल ओमप्रकाश बोहते आणि दीपक सुभाषराव ढाकणे यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी मंगळवारी दिला.

वाॅर्डबॉयने चोरले १७ रेमडेसिविरनागपूर : शुअरटेक रुग्णालयाचा वॉर्डबॉय ईश्वर मंडलने साथीदारांच्या मदतीने आठवडाभरात १७ रेमडेसिविर इंजेक्शन्स चोरली. १४ रेमडेसिविरची कथित पत्रकार व औषध वितरक विकास ऊर्फ लक्ष्मण पाटील याच्या मदतीने विक्री केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या