शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

उन्हाळी सुटीच्या अखेरच्या टप्प्यात साईनगरी भाविकांनी फुलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 04:40 IST

उन्हाळी सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यात साईनगरी भाविकांनी फुलली आहे़

शिर्डी : उन्हाळी सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यात साईनगरी भाविकांनी फुलली आहे़ भाजून काढणाऱ्या उन्हाची तमा न बाळगता भाविक साईदर्शनाचा आनंद लुटत आहेत़यंदा लोकसभा निवडणूक, तीव्र उन्हाळा व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुट्या लागूनही शिर्डीत अपेक्षित गर्दी नव्हती़ मात्र निवडणुकांचा निकाल लागताच भाविकांचा ओघ शिर्डीकडे वळला आहे. सुटीचा शेवटचा टप्पा असल्याने गर्दी वाढली आहे. मंदिर परिसर व रस्ते भाविकांनी गजबजून गेले आहेत़भाविकांना मोफत दर्शन पासेस काढण्यासाठी ऐन उन्हात पायपीट करावी लागत आहे़ या पासेसनुसार दर्शनाचे कोणतेही शेड्युलिंग होत नसताना केवळ शीरगणतीसाठीच त्याचा उपयोग होत असल्याचे दिसते आहे. वृद्ध व अपंगांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ दर्शन रांगेचे काम पूर्ण झाल्यावर या पासेसचा उपयोग होऊ शकतो. मात्र तोवर हे पास म्हणजे भाविकांची शुद्ध छळवणूक असल्याचे चित्र आहे़ झटपट दर्शनासाठी पैसे मोजणाºया भाविकांनाही गर्दीमुळे अनेक तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले़ गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरही अवैध प्रवासी वाहतूक करणारे सर्रास दिसत होते़>कोकणात पर्यटकांची गर्दीरत्नागिरी : गणपतीपुळे, पावससह धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरे-वारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. गणपतीपुळे, आरेवारे, काजिरभाटी, मांडवी, भाट्ये बीच, गुहागर, राजापूर, मार्लेश्वर, रत्नागिरी, दापोली, याठिकाणी राज्यासह परराज्यातील पर्यटकांनी गर्दी केली आहे.>‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी रांगकोल्हापूर : शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या व त्यात उन्हाळी सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विशेषत: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.