कर्जत : तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. सागरकुमार ढोबे, तर उपसरपंचपदी मंगल काशीनाथ पवार यांची बिनविरोध निवड झाली.
सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सोमवारी सकाळी विशेष बैठक घेण्यात आली. सरपंचपदासाठी डॉ. सागरकुमार ढोबे आणि उपसरपंचपदासाठी मंगल पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संजय जगताप यांनी दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर केल्या. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, माजी सभापती देवराव तांबे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, जाईबाई तांबे, ज्ञानेश्वर डुबल, फौमिदा सय्यद, मंगल भालेराव, काकासाहेब सकट आणि रोहिणी फरताडे आदींसह नारायण मोरे, अंकुश देवकर, शहाजी पाटील, भागवत ढोबे, रोहिदास ढोबे, अंकुश शेळके आणि संतोष निकम आदी उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
किरण पाटील म्हणाले, ग्रामपंचायत स्थापनेपासून टाकळी खंडेश्वरी येथील ग्रामस्थांनी विश्वास टाकून सेवेची संधी दिली. या ही निवडणुकीत स्थापलिंग ग्रामविकास मंडळाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.
सरपंच डॉ. सागरकुमार ढोबे म्हणाले, प्रा. किरण पाटील, देवराव तांबे यांच्यासह सर्व वरिष्ठांनी मला सरपंचपदी काम करण्याची संधी दिली. त्याचे सोने करू, अशी ग्वाही दिली. ग्रामविकास अधिकारी संगीता घोडेकर यांनी आभार मानले.
--
१५ सागरकुमार ढोबे, मंगल पवार