शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सेंटरमध्ये यज्ञ करणे ही अंधश्रद्धा नव्हे श्रद्धाच- सुजित झावरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 14:04 IST

अहमदनगर : कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कुणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

अहमदनगर : कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कुणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पारनेर तालुक्यातील वसंतराव झावरे पाटील कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करण्यात आला. अंनिसने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. झावरे म्हणाले की,  कोरोनावर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे औषध सापडलेले नाही. जे चालू आहे ते अंदाजे चालू आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड देणे देऊन जर कोरोना रुग्णांना समाधान मिळत असेल तर यज्ञ करण्यात काही गैर नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवूनच हा यज्ञ करण्यात आला होता. गाईच्या दुधापासून बनविलेले तूप व गोवरी जाळल्यामुळे त्यातून ऑक्सिजनच बाहेर पडतो, हे विज्ञान सांगते.  मी सांगत नाही. हा दृष्टिकोन समोर ठेवून महायज्ञ केला. त्यामुळे कोरोना रुग्णांना एक प्रकारचा आत्मविश्वास आला. आपल्या पाठीमागे परमेश्वर आहे, अशी भावना या रुग्णांमध्ये निर्माण झाली,  असे असताना अंनिसने जिल्हाधिकाऱ्यांकडे महायज्ञबाबत तक्रार केलेली आहे. इतर सेंटरमध्ये प्रवचने, वेगवेगळे कार्यक्रम होतात, याबाबत मात्र कुणीच का बोलत नाही. आम्ही यज्ञ केल्यामुळे नंतर मात्र कारवाईची मागणी होते. मग अशा सेंटरबाबत अंनिस गप्प का आहे ? असा सवाल उपस्थित करत यामागे काहीतरी राजकीय षड्यंत्र आहे, असा आरोपही झावरे यांनी यावेळी बोलताना केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या