याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश रावसाहेब उमाप (वय २०, रा. नालेगाव) याच्याविरोधात विनयभंग व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमाप हा सदर मुलीस जानेवारी २०२१ पासून माझ्याशी प्रेम ठेव, असा अट्टहास करत होता. मुलीने नकार दिला तेव्हा तिच्या घराजवळ येऊन हॉर्न वाजविणे, शिट्टी वाजविणे, पाठलाग करणे, असा मानसिक त्रास देत होता. या त्रासला कंटाळून सदर मुलगी तिच्या नातेवाइकांकडे गेली तेव्हा आरोपीने तिच्या नातेवाइकाच्या मोबाइलवर फोन करून माझ्यासोबत पळून चल, नाही तर सुसाइड करेन, अशी धमकी दिली, तसेच मुलीच्या भावाला बोलावून दमदाटी केली, असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक विश्वास भान्सी हे पुढील तपास करत आहेत.
पळून चल, नाहीतर सुसाइड करेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST