शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नगरचे पाणी बीड पळविणार ही अफवा-पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 17:10 IST

राज्यात येत्या २४ तारखेला रात्रीच्या १२ वाजून १२ मिनीटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. ३७० हा आमच्या प्रचाराचा नव्हे तर आमच्या स्वाभिमानाचा व संस्काराचा मुद्दा आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच नगरचे पाणी बीडला पळविणार या अफवेचा त्यांनी समाचार घेतला.

पांढरीपूल : राज्यात येत्या २४ तारखेला रात्रीच्या १२ वाजून १२ मिनीटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. ३७० हा आमच्या प्रचाराचा नव्हे तर आमच्या स्वाभिमानाचा व संस्काराचा मुद्दा आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच नगरचे पाणी बीडला पळविणार या अफवेचा त्यांनी समाचार घेतला.राहुरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले, नेवासा मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी पांढरी पूल येथे झालेल्या जाहीर सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी डॉ सुजय विखे उपस्थित होते. मुंडे पुढे म्हणाल्या, नगरच्या मुळाचे पाणी बीडमध्ये जाणार अशी अफवा सध्या जोरात सुरू आहे. आम्ही पाणी पळवणारे नाही तर पाणी पाजणारे आहोत. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. आमच्याकडे कर्डिले, मुरकुटे यांच्यासारखे टोपीवाले आमदार आहेत. यामुळे राष्ट्रवादीवाल्यांनी आता लोकांना टोपी घालण्याचे उद्योग बंद करावेत. राज्याच्या निवडणुकीत देशाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीची एक हाती सत्ता येणार आहे. आम्ही एक एक आमदार विजयी व्हावा यासाठी स्वत:चे मतदारसंघ सोडून राज्यभर फिरत आहोत.  युती सरकारने मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला. जातीपातीचे राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेने सुरू आहे, असेही मुंडे म्हणाल्या.  

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019