शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जवळेत प्रशासनाचा धिक्कार : रास्तारोको पोलिसांनी रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 17:33 IST

पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून ते सिद्धेश्वर ओढ्यापर्यंतच्या पात्रातून होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी २ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून ते सिद्धेश्वर ओढ्यापर्यंतच्या पात्रातून होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी २ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याची दखल घेण्यात न आल्याने ग्रामस्थांनी गुरूवारी रास्तारोकोचे आयोजन केले होते. त्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थांनी निषेधसभा घेऊन त्यात प्रशासनाचा धिक्कार नोंदविला.वाळू चोरी झालेल्या ठिकाणचे तहसीलदार व महसूल विभागाने पंचनामे करून दोषींविरूद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे. आमरण उपोषणास पाच दिवस होऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी निघोज-शिरूर रस्त्यावर रास्तारोको करण्याचा इशारा आंदोलक ग्रामस्थांनी दिला होता. पण जिल्ह्यात जमावबंदी असल्याचे कारण देत पोलिसांनी रास्ता रोकोस मज्जाव केला. त्यामुळे निघोज येथील दारूबंदी चळवळीतील कार्यकर्ते बबनराव कवाद यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधसभा घेण्यात आली.यावेळी ते म्हणाले, तहसीलदार व महसूल विभाग मुळात भ्रष्ट असून हप्तेखोर आहे. स्वत: हप्ते गोळा करायचे व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले तर ग्रामस्थांना वाळू चोर कोण आहे? हे विचारले जाते. हप्ते तुम्ही घ्या व फाशी जनतेला का? उपोषणार्थी रामदास घावटे यांच्याविरोधात आजपर्यंत चार खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाचवा गुन्हा केव्हा घडतोय याची वाट पोलीस प्रशासन वाट पाहत आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वाळूचे पंचनामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याची मागणी केली.निषेध सभेच्या ठिकाणी येऊन नायब तहसीलदार राजेंद्र दिवाणे यांनी वाळू चोरीचे पंचनामे करण्यात येतील, असे सांगून घावटे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. घावटे यांनी याबाबत विशिष्ट कालावधीत गुन्हे दाखल करू, भविष्यात कोणी असा प्रकार केल्यास संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करू, असे लेखी देण्याची मागितली. त्यावर नायब तहसीलदार दिवाणे यांनी, आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून लेखी देण्याचे आदेश नसल्याचे सांगितले. त्यामुळे चर्चा यशस्वी न झाल्याने उपोषण पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर