शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

कुकडी कालव्यावरील भरारी पथकास दमबाजी : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:29 IST

कुकडी कालव्यावर पाण्याचे नियोजन करीत असलेल्या भरारी पथकाने पाणी उपसा करीत असलेल्या विद्युत पंपाचे पाईप काढल्याचा राग धरुन राजाराम प्रभाकर दळवी, संजय प्रभाकर दळवी व इतर दहा ते बारा जणांच्या जमावाने देऊळगाव (ता. श्रीगोंदा) यांनी भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश लंकेश्वर व इतरांना शिविगाळ करुन बंद केलेले पंप जबरदस्तीने पुन्हा सुरु केले.

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावर पाण्याचे नियोजन करीत असलेल्या भरारी पथकाने पाणी उपसा करीत असलेल्या विद्युत पंपाचे पाईप काढल्याचा राग धरुन राजाराम प्रभाकर दळवी, संजय प्रभाकर दळवी व इतर दहा ते बारा जणांच्या जमावाने देऊळगाव (ता. श्रीगोंदा) यांनी भरारी पथकाचे प्रमुख प्रकाश लंकेश्वर व इतरांना शिविगाळ करुन बंद केलेले पंप जबरदस्तीने पुन्हा सुरु केले. मंगळवारी २२ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कुकडी कालवा डी वाय चारी क्रमांक १२ नजीक ही घटना घडली.भरारी पथकाचे प्रमुख लंकेश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलिसांनी संजय दळवी, राजाराम दळवी यांना अटक केली आहे. लंकेश्वर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक कुकडी कालव्यावर गस्त घालत होते. हे पथक डी वाय १२ जवळ आले असताना एक विद्युत पंप चालू असल्याचे निदर्शनास आले.पथकातील कर्मचाऱ्यांनी पंप बंद करून पाईप बाजुला काढले. याचा राग येऊन दळवी यांच्यासह दहा ते बारा जणांना एकत्र करून पथकातील कर्मचाºयांना शिविगाळ केली. इतर शेतक-यांना पंप चालू करण्यास सांगितले. शिविगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन श्रीगोंदा पोलिसांनी वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा