अहमदनगर : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे सर्वोच्च न्यायालयात राजकीय आरक्षण रद्द झाल्याने रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नगरमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरातील स्टेट बँक चौकातून मोर्चाने जाऊन कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
या आंदोलनात पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी माणिकराव दांगडे, सय्यदबाबा शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष गंगाधर कोळेकर, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा जर्हाड, गोरख वडितके, डॉ. जिल्हा सचिव सुनील चिंधे, संदीप कादळकर, शहर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कोकरे, शहाजी कोरडकर, मंदाकिनी बडेकर, रमाजी केमकर, माणिकराव शिंदे, भगवान करवर, अमोल शर्माळे, विनायक नजन, बाजीराव लेंडाळ, मीना राहिंज, राजेंद्र महारले आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्ष जुंधारे म्हणाले, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारने न्यायालयात आवश्यक बाबींची वेळेत पूर्तता केली नाही. परिणामी न्यायालयाने तीन अटींची पूर्तता करेपर्यंत आरक्षणाला स्थगिती दिली आहे. आता राज्य सरकारने ओबीसी आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींची पूर्तता करावी, ओबीसी समाजाचा डाटा जमा करून तातडीने न्यायालयात द्यावा, तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षण स्थगिती उठविली जात नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळावे, नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जुंधारे यांनी दिला.
-------------------
कार्यकर्ते झोपले वाहनांसमोर
स्टेट बँक चौकातून मोर्चा काढल्यानंतर रासप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून सरकारचा निषेध केला. मागण्यांची पूर्तता न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.
...................
फोटो ०४ आंदोलन
ओळी-
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांच्यासह सहभागी झालेले कार्यकर्ते.