शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वाळूसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त;  पाच जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 18:10 IST

संगमनेर तालुक्यातील खैरदरा  गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. ३ ब्रास वाळूसह सुमारे ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

घारगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्यासह पथकाने संगमनेर तालुक्यातील खैरदरा  गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजलेच्या सुमारास ही कारवाई केली. ३ ब्रास वाळूसह सुमारे ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोघेजण फरार झाले आहेत.पोलीस नाईक अनिल रघुनाथ कडलग यांनी दिलेल्या फियार्दीवरून डंपर चालक संकेत हरिभाऊ लामखडे (रा.केळेवाडी, बोटा, ता.संगमनेर) याच्यासह मालक संतोष तुळशीराम शेलार (रा. अकलापूर, ता.संगमनेर) तर ट्रक चालक व मालक उबेद मन्सूर पटेल (रा.साकुर), यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित मोरे (रा.खैरदरा) जेसीबी चालक(नाव माहित नाही ) हे जेसीबी घेऊन फरार झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खैरदरा परिसरात वाळूची अवैध चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक अनिल कडलग, पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब हांडे हे दुचाकीवरून खैरदरा येथे गेले.माहिती घेत असताना त्यांना एका शेतात वाळूच्या साठ्यासह एक ट्रक व एक डंपर दिसून आला. पथक खाजगी वाहनाने जांबूत-मोरेवाडी रस्त्याने जात असताना त्यांना एक डंपर जेसीबीच्या सहाय्याने व दुसरा ट्रक मजुरांच्या सहाय्याने वाळू भरताना दिसून आला. पोलिसांचे पथक त्यांच्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच जेसीबी चालकाने अंधाराचा फायदा घेत जेसीबी पळवला. चौकशी दरम्यान वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलीस पथकाने ३ ब्रास वाळूसह डंपर (क्रमांक एम. एच. -१७, बी. डी. ६८५५) व ट्रक (क्रमांक एम. एच. १२ एफ. सी. ७२५४ ) असा एकूण ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.

टॅग्स :Sangamnerसंगमनेरsandवाळू