शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर वाढत्या अत्याचाराचा आरपीआयच्या वतीने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 14:51 IST

अहमदनगर- महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांवर वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी करण्यात आली.

अहमदनगर- महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांवर वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी करण्यात आली.

 

यावेळी आरपीआयचे भिंगार युवक शहराध्यक्ष तथा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, दिपक गायकवाड, अविनाश भोसले, प्रविण वाघमारे, संदिप वाघचौरे, दया गजभिये, विवेक भिंगारदिवे, प्रकाश भिंगारदिवे, अमोल पाटोळे, युवराज पाखरे, अविनाश शिंदे, ईश्‍वर करोसिया आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून अत्याचाराच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. ही चिंताजनक व निंदनीय बाब आहे. नागपूरच्या नरखेड मधील पिंपळधरा गावातील अरविंद बनसोड तर पुणे पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप यांचा जातीय कारणातून निर्घुण खून करण्यात आला. तसेच औरंगाबाद, जालना, परभणी, बीड इत्यादी ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांमधून  हत्याकांड देखील झालेले आहेत. या सर्व प्रकरणामुळे अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये सरकार बद्दलचा असंतोष बळावत आहे. सरकारी पातळीवरून जातीय अत्याचाराच्या घटनाकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

राज्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शासनाने नवा कृती कार्यक्रम राबवावा, जातीय अत्याचार व खुनाच्या घटनांचा तपास सरसकट राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा, जातीय अत्याचाराच्या सर्वच घटना यापूर्वी निश्‍चित केलेल्या धोरणानुसार जलदगती न्यायालय मार्फत सुनिश्‍चित कालखंडात चालवल्या जातील यासाठी विशेष न्यायालयीन समिती नियुक्त करण्यात यावी, जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये दुसर्‍यांचा गुन्हा दाखल होणार्‍या व्यक्तीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात यावी, जातीय अत्याचाराच्या घटना नोंद करण्यास व तपासामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याबाबत जबाबदारी वरिष्ठ अधिकार्‍यांवर निश्‍चित करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन कार्यकर्त्यांनी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवला. सदर मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शाहुराव मोरे यांना देण्यात आले.