शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नेवासाफाटा येथे झोपडपट्टी धारकांचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:31 IST

तहसीलदारांनी शासनस्तरावर आपल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले

भानसहिवरा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील वनविभागाच्या अखत्यारितील सुमारे १२ हेक्टर ८२ आर क्षेत्रापैकी ४ हेक्टर क्षेत्र गावठाणाच्या विस्तारासाठी घरकूल व विविध शासनाच्या योजना राबविण्याच्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी मंगळवार नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.अ‍ॅड. बन्सी सातपुते म्हणाले, वनविभागाचे १२ हेक्टर ८२ आर क्षेत्र असून वनविभागाच्या जागेवर सुमारे ४७ वर्षांपासून गोरगरीब लोक चार हेक्टर क्षेत्रावर वास्तव्य करत आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी चार हेक्टर क्षेत्र ग्रामपंचायतीसाठी वर्ग केल्यास त्यांना मूलभूत सुविधा मिळू शकतात. त्या दृष्टीने शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. गोरगरिबांना मूलभूत सेवा मिळण्यासाठी चार एकर क्षेत्र वनविभागाने ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी शासन स्तरावर कायदेशीर मार्गाने कागदपत्रांची पूर्तता केली जाईल असे सांगितले.मुकिंदपूरचे सरपंच सतिष निपुंगे म्हणाले, वनविभागाच्या जागेत सुमारे ४७ वर्षांपासून गोरगरीब लोकांनी येथे वस्ती केली आहे. त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी मोठा निधी ग्रामपंचायतीकडे पडून आहे. मात्र जागेच्या प्रश्नामुळे त्यांना मूलभूत सुविधा व लोकवस्तीमध्ये विकास करण्यासाठी खोळंबा होत आहे.यावेळी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना रास्ता रोको प्रसंगी निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी शासनस्तरावर आपल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. या रास्ता रोको प्रसंगी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.यावेळी मुकिंदपूरचे सरपंच सतिष निपुंगे, राजू साळवे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, अशोक करडक, भाऊ सदाफुले, राजू बोलके, अमित मेहर, महेश निपुंगे, संजय निपुंगे, ग्रामपंचायत सदस्य माउली देवकाते, गणेश माटे आदींसह झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा