शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांची भूक भागविणारी रॉबिनहूड आर्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 11:27 IST

जगातल्या ५२ देशात आणि भारतातील १०० शहरात निराधाराची भूक भागविणाऱ्या राबिनहूड आर्मी या सामाजिक संस्थेने नगर शहरातही उपक्रम सुरू करून गरिबांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले २० सदस्य सध्या या सामाजिक उपक्रमात सक्रिय काम करत आहेत.

अहमदनगर : जगातल्या ५२ देशात आणि भारतातील १०० शहरात निराधाराची भूक भागविणाऱ्या राबिनहूड आर्मी या सामाजिक संस्थेने नगर शहरातही उपक्रम सुरू करून गरिबांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले २० सदस्य सध्या या सामाजिक उपक्रमात सक्रिय काम करत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून रॉबिनहूड आर्मीचे कार्य आणि उपक्रमाचा उद्देश सांगून अन्न गोळा केला जाते. लग्नकार्य, मूंज, वाढदिवस यासह अन्नदात्यांकडून खाणेयोग्य अन्न संकलित करून दर रविवारी शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, झोपडपट्टी येथे राहणा-या निराधार, गरिबांपर्यंत हे अन्न पोहोचविले जाते.नगर शहरात जानेवारी २०१८ पासून अमित भांड, रूपेश नायर, परेश भाटे, अमित कोठारी, शंतनू संत, चिराग शेटिया, शुभम खोट, शुभम कुलकर्णी, शिरिष लहाडे, अमोल लोढा, भूषण डुंगरवाल, संतोष सरवदे, वासुदेव सचदेव, वैशाली मालपाणी, ज्योती हिमनानी, योगिता मुथा, डॉ. शमा मंत्री या सदस्यांनी रॉबिनहूड आर्मीचा हा सामाजिक उपक्रम सुरू केला. या कामाला शहरातील नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात विविध ठिकाणी ४५० ते ५०० निराधार, गरीब विविध ठिकाणी राहतात़ यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे मात्र उत्पादनाचे कोणतेही साधन नाही. यातील बहुतांशी जणांना भिक्षा मागून उपजिवका भागवावी लागते. उपाशीपोटी राहणा-या निराधारांची भूक भागावी आठवड्यातून किमान एक ते दोन दिवस त्यांना पौष्टिक अन्न मिळावे, या उद्देशातून शहरात रॉबिनहूड आर्मी कार्यरत करण्यात आली आहे.५०० गरिबांना सात किलो धान्य देणाररॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून १५ आॅगस्ट रोजी शहरातील ५०० गरिबांना सात किलो धान्याची बॅग देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आर्मीतील सदस्यांनी जनसंपर्क सुरू केला असून, नागरिकांमधून त्यांना प्रतिसाद मिळत आहे.भुकेलेल्या गरिबांपर्यंत अन्न पोहोचावे, अन्नाची होणारी नासाडी थांबावी याच उद्देशातून नगर शहरात रॉबिनहूड आर्मीची शाखा सुरू करण्यात आली आहे. या अर्मीतील प्रत्येक सदस्य वेळ काढून अन्नसंकलनासाठी काम करतो. संकलित केलेले अन्न आधी सदस्य खातात. ते दर्जेदार आहे का याची पाहणी केल्यानंतरच ते निराधारांना दिले जाते. दर रविवारी ४०० ते ४५० जणांना अन्न दिले जाते. अन्नादान करणा-यांनी ९०११००९१३४ या क्रमांकावर संपर्क करावा.- अमित कोठारी, अमित भांड, परेश भाटे सदस्य-रॉबिनहूड आर्मी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर