शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेवाशात मोकाट जनावरांचा रास्तारोको; नगरपंचायतीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:28 IST

नेवासा शहरात दररोज ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा रास्ता रोको होत असून अनेकदा वाहतूक विस्कळीत होत आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

नेवासा : नेवासा शहरात दररोज ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा रास्ता रोको होत असून अनेकदा वाहतूक विस्कळीत होत आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.नगरपंचायत रस्ता, औदुंबर चौक, संभाजी चौक, बाजारतळासह मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा संचार दिवसभर असल्याने सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत काळात मोकाट जनावरांसाठी असलेला कोंडवडा बंद झाला आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर असलेल्या भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांना मोकाट जनावरांचा वावर असतो. याचा त्रास भाजी विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना सुद्धा होतो. जनावरे हाकलले तरी हालत नाहीत. पिशवीतील भाजी ओढणे, धक्के देणे यामुळे भाजी मंडईमध्ये व रविवारच्या बाजारात ग्राहक किरकोळ जखमी होत आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील एका व्यक्तीला देखील या मोकाट जनावरांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.ज्ञानेश्वर मंदिर मार्ग तसेच शेवगाव-श्रीरामपूर रस्ता, बसस्थानक, गणपती मंदिर, नाथबाबा चौक याठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यात बसून राहिल्यामुळे राजमार्गावर जनावरांच्या रास्तारोकोमुळे दररोज ट्राफिक जाम होत असतो. सध्या वाळू उपसा बंद असल्याने वाळू वाहतूक करणारे गाढवे नेवासा शहरात गल्लीबोळीत फिरत असतात. तर मोकाट गायींची संख्या जास्त झाली आहे. शहरामध्ये दर तीन चार महिन्यांनी अज्ञात टेम्पोद्वारे कुत्रे आणून सोडले जातात. पण यावर कोणत्याही खात्याचे लक्ष नाही. तसेच श्वान निर्बिजीकरणाची कोणतीही मोहीम ग्रामपंचायतीने देखील राबवलेली नाही आणि आता नगरपंचायतही राबवत नाही.ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद मुलांची शाळा, मुलींची पाकशाळा, गावातील ग्रामदैवत मोहिनीराज मंदिरासमोर मोकाट जनावरे बसून राहतात. अथवा त्यांच्या लढतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शाळेत सुद्धा जाता येत नाही. नेवासा नगरपंचायतीने पाच महिन्यात ३-४ वेळा मोकाट जनावरांच्या मालकांना सूचना देण्यासाठी रिक्षा फिरविली व वृत्तपत्रात जाहिरातही दिलेली आहे. मात्र अद्याप यावर कुठलीही कार्यवाही नगरपंचायत प्रशासनाने केलेली दिसत नाही. जनावरांचा कोंडवाडा नसल्याने मोठी अडचण होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाMuncipal Corporationनगर पालिका