शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरात रास्ता रोको

By शेखर पानसरे | Updated: September 2, 2023 13:02 IST

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेल्या लाठीचार्जचा निषेध

- शेखर पानसरेलोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना शनिवारी (दि.०२) संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

      मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. ‘मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जचा जाहीर निषेध’, ‘एक मराठा लाख मराठा’ असे फलकही आंदोलनकर्त्यांनी झळकवले. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच विविध राजकीय पक्ष, संघटना यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते.  सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी गावात शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेसुमार लाठीचार्ज झाला, त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई करावी. आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण