शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

विदेशात शिकलो तरी शेतीशी नाळ कायम-ऋतुराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:44 IST

विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.

संगमनेर : विदेशात शिकलो असलो तरी मुळात आम्ही शेतकरी आहोत. त्यामुळे आमची शेतीशी नाळ कायम आहे. घरात मोठी राजकीय, सामाजिक परंपरा आहे. काम करताना याबाबींचे थोडे दडपण असते. मात्र गेल्या दहा वर्षापासून समाजात काम करत असल्याने आता दडपण वाटत नाही, असे विचार कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत आमदार पाटील बोलत होते. घरातील मोठ्यांचा वारसा सांभाळताना दडपण येते का? याबाबत पाटील म्हणाले, अगदी लहापणापासून डी.वाय.पाटील, सतेज पाटील यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक जीवन, त्यांची काम करण्याची पद्धत समजून घेतली. आता नवी पिढी म्हणून ही परंपरा सांभाळताना थोडे दडपण असते. समाजात काम करत असताना मागच्या पिढीची आणि नव्या पिढीच्या कामाची तुलना होते. त्यामुळे चांगले काम करावे लागते. कष्ट करावे लागतात. मी कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे आणि करत राहणार, असे पाटील यांनी सांगितले.विदेशात शिक्षण घेतले तेथील वातावरण पाहून तेथेच रहावे वाटले नाही का? या प्रश्नावर पाटील म्हणाले, अमेरिकेत शिक्षण झाले. मात्र आमच्या कुटुंबाची परंपरा समाजसेवेची आहे. त्यामुळे आम्ही विदेशात राहणे शक्यच नाही. आपल्या मातृभूमीत काही तरी केले पाहिजे याची ओढ होतीच. आपले राज्य कसे पुढे गेले पाहिजे हाच मनात ठेऊन येथे आलो. त्यातूनतच सध्या समाजात काम करीत आहे, असेही पाटील म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRuturaj Patilऋतुराज पाटीलSangamnerसंगमनेरinterviewमुलाखत