कोरोनामुळे ॲडमिट कराव्या लागणाऱ्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतीचे प्रमाण २०-३० टक्के आढळून आले आहे.
त्यामुळे कोरोनाबाधित जे रुग्ण ॲडमिट करावे लागतात, त्यांना रक्त पातळ करणारी औषधे देणे गरजेचे ठरते.
सौम्य कोरोनाबाधित रुग्ण ज्यांना ॲडमिट करायची गरज पडत नाही, त्यांना रक्त पातळ करणारी किंवा अँटी प्लेटलेट औषधे देण्याची गरज नाही.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डिस्चार्जनंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण हे जवळपास १.५ ते १.७ टक्के इतके आहे.
त्यामुळे डिस्चार्जनंतर कोरोनाबाधित रुग्णांना रक्त पातळ करणारी औषधे दिल्यास या गुंतागुंतीचा प्रतिबंध करता येतो.
लसीकरणानंतर मात्र अशी औषधे घेण्याची गरज नाही.
जर एखाद्या पेशंटला आधीपासूनच रक्त पातळ करणारी औषधे चालू असतील तर ती औषधे चालूच ठेवावी व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याची कल्पना द्यावी.
डी-डायमर (D-dimer) नावाची तपासणी करून रक्ताच्या गुठळ्या होऊन गुंतागुंत होण्याची शक्यता किती आहे, हे जाणून घेता येते; परंतु गरोदर स्त्रियांमध्ये ती तपासणी उपयोगी पडत नाही.
..............
-डॉ. अभिजित बाहेती, औरंगाबाद.
इंडियन मेडिकल असोसिएशन अहमदनगर शाखा.