शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भेंड्यातील हल्लाप्रकरणी दंगलीचा गुन्हा

By admin | Updated: October 15, 2016 00:54 IST

भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथील मोबाईल शॉपी व दुकान मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अतिक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नेवासा

भेंडा : भेंडा (ता. नेवासा) येथील मोबाईल शॉपी व दुकान मालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अतिक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नेवासा पोलिसांनी पाच जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेतील आरोपी अद्याप फरार आहेत.अतिक अब्दूल रशिद शेख (वय ३७, रा. भेंडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास देवा कान्हू धनवडे, सुरेश कान्हू धनवडे, हिरालाल सीताराम धनवडे व इतर दोन अनोळखी (सर्व रा. भेंडा खुर्द) दुकानात आले. देवा धनवडे याने मोबाईल रिचार्ज न केल्याच्या रागातून शिवीगाळ करुन धमकी दिली. व लोखंडी पाईपने दुकानाच्या काऊंटरचे नुकसान करुन काचा फोडल्या. दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी जाब विचारल्यानंतर माझ्या कपाळावर मारहाण करण्यात आली.सुरेश धनवडे याने बाटलीतील पेट्रोल दुकान व माझ्या अंगावर फेकले. मी घाबरून दुकानाबाहेर जात असताना हिरालाल धनवडे याने काडी पेटवून अंगावर फेकली. ती झटकून मी जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत असताना देवा धनवडे याने माझा डावा हात व डोक्यावर पाईपने मारहाण केली. मी ओरडा केल्यानंतर इतर आरोपींनी दमदाटी देऊन शिवीगाळ केली. व आमच्या नादी लागला तर जीवे मारु, अशी धमकी दिली, असे अतिक शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. या घटनेतील आरोपी देवा कान्हू धनवडे यास शुक्रवारी सायंकाळी गोेंडेगाव शिवारात अटक करण्यात आली. अतिक शेख यांच्या तक्रारीनुसार नेवासा पोलिसांनी वरील आरोपींविरुध्द खुनाच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे करीत आहेत. (वार्ताहर)