शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून भावाच्या घरावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 10:39 IST

शिर्डी : शेतीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना येथून जवळच असलेल्या बहादराबाद येथे घडली ...

शिर्डी : शेतीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना येथून जवळच असलेल्या बहादराबाद येथे घडली आहे़ मुख्य आरोपी असलेल्या सख्या भावासह पाच जणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे़पोलीस सूत्रांची माहिती अशी की, सुनील मारुती पाचोरे व बाळासाहेब पाचारे हे दोघे सख्खे भाऊ आहेत़ त्यांच्यात शेतीच्या वादातून वितुष्ट आले होते़ यातून बाळासाहेब याने भावाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने सुनील पाचारे यांच्या घरावर भाडोत्री दरोडेखोरांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे उघडकीस आले. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास पोहेगाव शिवारात बहादराबाद येथील सुनील मारुती पाचोरे हे कुटुंबासह घरात झोपले असताना त्यांच्या घरावर दरोडा पडला होता़ रोडवर अपघात झाल्याचे सांगत पाणी मागण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडण्यास भाग पाडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला होता़ यावेळी त्यांनी घरातील लोकांना दमदाटी शिवीगाळ मारहाण करून ९५ हजार ५०० रुपये व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता़ यासाठी प्रत्येक आरोपीला साडे आठ हजार रूपये दिले होते़याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल होता़ घटनेचा तपास करीत असताना राहता येथील आकाश बाळासाहेब गायकवाड याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.यावरून पोलिसांनी बाळासाहेब मारुती पाचोरे (वय ३५, रा.बहादराबाद, ता.कोपरगाव) यांच्यासह आकाश बाळासाहेब गायकवाड (वय २१, रा. आंबेडकरनगर, राहाता), योगेश कोंडीराम खंडीझोड (वय २१, रा. वेस तालुका, कोपरगाव), प्रवीण रामनाथ खंडीझोड (वय २१), रा.सोयगाव (ता.कोपरगाव), अक्षय अशोक पारधे (वय १९, रा. पारधे वस्ती, अस्तगाव रोड, राहाता) या आरोपींना अटक केली आहे़ याशिवाय वीरेश सुरेश कोपरे (रा.राहाता) हा अद्याप फरार आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी