शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

तांदळी दुमालात कुकडी कालवा तोडला; शेतक-यांच्या घरासह पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:03 IST

श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या मुख्य कालव्याचा दरवाजा अज्ञातांनी उघडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडले. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे चारीला अचानक पाणी आले. यामुळे आढळगाव शिवारात पुलाच्या नळ्यांमध्ये चारीतील कचरा अडकला. परिणामी पाणी चारीवरून ओसंडून वाहत शेतक-यांच्या घरांसह पिकांमध्ये घुसले. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. 

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडीच्या मुख्य कालव्याचा दरवाजा अज्ञातांनी उघडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडले. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या प्रकारामुळे चारीला अचानक पाणी आले. यामुळे आढळगाव शिवारात पुलाच्या नळ्यांमध्ये चारीतील कचरा अडकला. परिणामी पाणी चारीवरून ओसंडून वाहत शेतक-यांच्या घरांसह पिकांमध्ये घुसले. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. सध्या कुकडी कालव्याचे कर्जत तालुक्यासाठी आवर्तन सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातून जाणा-या मुख्य कालव्याचा दरवाजा तांदळी दुमाला शिवारात अज्ञातांनी तोडून पाणी चारी क्रमांक १३ ला सोडून दिले. उपचा-यांचे दरवाजे बंद असल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने आढळगावकडे झेपावला. परिसरातील शेतक-यांनी चारीमध्ये टाकलेला कचरा आढळगाव-चांडगाव रस्त्यावरील पुलाच्या नळ्यामध्ये अडकला. त्यामुळे पाणी चारीच्यावरून वाहू लागले. नजीकचे शेतकरी जालिंदर शिंदे यांच्या मिरचीच्या शेतात तीन चार फूट पाणी साचले तर देविदास शिंदे यांच्या कांदा आणि डाळिंबामध्ये पाण्यामुळे नुकसान झाले. बाजीराव भोसले आणि राजू काळे यांच्या घरात मध्यरात्री अचानक पाणी आल्यामुळे लहान मुले घाबरली. कुकडीच्या अधिका-यांना सकाळी कळविल्यानंतर चारीचा दरवाजा बंद करण्यात आला. शुक्रवारी सकाळी दहानंतर पाण्याचा प्रवाह बंद झाला.नियमित आवर्तनात अडथळा निर्माण करण्याच्या हेतूने अज्ञातांनी दरवाजा उघडला होता. त्यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, असे श्रीगोंदा येथील सिंचन शाखेचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांनी सांगितले.

टॅग्स :DamधरणAhmednagarअहमदनगर