शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

रिव्हॉल्व्हरचा ‘तो’ परवाना निलंबित ?

By admin | Updated: June 17, 2014 00:35 IST

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान चुकून गोळी सुटलेल्या रिव्हॉल्वर हाताळण्यामध्ये वापरकर्ते संभाजी रोहोकले यांचा निष्काळजीपणा कारणीभूत

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान चुकून गोळी सुटलेल्या रिव्हॉल्वर हाताळण्यामध्ये वापरकर्ते संभाजी रोहोकले यांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. त्यामुळे या रिव्हॉल्वरचा परवाना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला असून तो नगरच्या प्रांताधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.रविवारी मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नेत्यांच्या उपस्थितीत सभा सुरू होती. या सभेतून बाहेर पडल्यानंतर संभाजी रोहोकले यांची कमरेच्या डाव्या बाजुला लावलेली रिव्हॉल्वर खाली पडली. ती लोडेड असल्याने त्यामधून गोळी सुटली आणि ती छताला लागली. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला आहे. रिव्हॉल्वर हाताळण्यामध्ये रोहोकले यांनी निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. रिव्हॉल्वरची नियमित साफसफाई त्यांनी अनेक दिवसांपासून केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील यांनी . रोहोकले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अदखलपात्र गुन्हा नोंदवून पोलिसांनी रोहोकले यांची जामिनावर सुटका केली आहे. (प्रतिनिधी)‘तो’ परवाना राज्याचारोहोकले यांनी २००६ मध्ये स्वसंरक्षणासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी परवाना घेतला होता. एक वर्षापूर्वी त्यांनी हा परवाना महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी करून घेतला. त्यामुळे त्यांना कोणत्याही ठिकाणी शस्त्र वापरण्याची परवानगी होती. कुठेही जावू द्या, नेहमीच शस्त्रं बाळगतो, असे त्यांचे उत्तर होते. रोहोकले हे निवृत्त मुख्याध्यापक असताना त्यांना शस्त्र कशासाठी़़? असा पोलिसांनी सवाल केला आहे. ठेकेदारी करीत असल्याने स्वसंरक्षणाची गरज असून त्यासाठीच शस्त्र बाळगत असल्याचे रोहोकले यांनी सांगितले.सभेत रिव्हॉल्वर कसे?एखादी सभा असली तर पोलीस बंदोबस्त नियुक्त केला जातो. सभेला मोठे नेते येणार असले तर मेटल डिटेक्टरसह अन्य तपासण्या केल्या जातात. तसेच कोणाकडे शस्त्र आहेत का याचीही पोलीस तपासणी करतात. मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातील मोठे नेते, मंत्री येणार असल्याचे अपेक्षित होते. त्यामुळे सभास्थळी पुरेसा बंदोबस्त असला तरी नागरिकांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे कोणाकडे शस्त्र आहेत का? हे आढळून आले नाही. शोकसभा असल्याने तपासणी किंवा मेटल डिटेक्टर ठेवण्याची आवश्यकता नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.