शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तालुक्यात क्रांतिकारी पक्षाचा दहा ग्रामपंचायतवर झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:34 IST

तालुक्यात झालेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दहा, भाजपने आठ तर राष्ट्रवादीने तीन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.

नेवासा : तालुक्यात झालेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दहा, भाजपने आठ तर राष्ट्रवादीने तीन ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या पत्नी लक्ष्मी गडाख प्रतिष्ठेच्या पानसवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बहुमताने निवडून आल्या.कम्युनिस्ट पक्षाचे बाबा आरगडे यांनी सौंदाळा गावात सरपंच पदासह ग्रामपंचायत ताब्यात घेतली. भाजपच्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपआपले गड राखले.गोमळवाडीतील सरपंच पद तर नांदूरशिकारी मधील एक सदस्य ईश्वर चिठ्ठीच्या आधारे निवडला गेला.पाथरवालाची निवडणूक बिनविरोध झाली होती. गडाख गटाचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या घोडेगावसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी १३०४ मतांच्या मोठ्या फरकाने बाजी मारली. तसेच १७ पैकी १२ जागांवर भाजपचे सदस्य निवडून आले. भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी देखील आपल्या जायगुडे आखाडा या ग्रामपंचायतीमध्ये एकतर्फी विजय मिळविला. सरपंचपदी इंदुबाई डौले निवडून आल्या. सर्व सदस्य भाजपचे निवडून आले. या दोन्हीही ठिकाणी विरोधकांचा एकही सदस्य निवडून आला नाही. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे यांच्या वडुले गावात ते स्वत: पुन्हा एकदा एकतर्फी सरपंच पदी निवडून आले. या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदी सर्व महिला निवडून आल्या आहेत.भाजपयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डिले यांना नांदूरशिकारी या गावामध्ये केवळ २ सदस्यांवर समाधान मानावे लागले. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या पानसवाडीत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बहुमताने सरपंचपदी विजयी झाल्या. याठिकाणी तुकाराम गडाख यांचे ७ सदस्य निवडून आले. या विजयाने तुकाराम गडाख यांच्या विधानसभेच्या हालचालींना वेग येणार आहे. सौंदाळा गावामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा आरगडे यांची सून प्रियंका शरद आरगडे या सरपंचपदी विजयी झाल्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर