शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत : सकल मराठा समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 11:15 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने झालेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अहमदनगर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने झालेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने या मुलांच्या भविष्याचा विचार करून हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.याबाबत शुक्रवारी कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. प्रशासनाला पूर्व कल्पना देऊन नगर शहरात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यानही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दोन वर्षांपासून शांततेच्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत़ राज्यात समाजाच्यावतीने ५६ मूकमोर्चे काढण्यात आले. यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र काही समाजकंटकांकडून मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी दगडफेक, वाहनांची तोडफोड होत असेल तर आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. नगर शहरातील कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन केले आहे. तरी पोलिसांनी काही तरूणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारांना सकल मराठा समाज पाठीशी घालणार नाही.पोलीस प्रशासनाने निरापराध तरूणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत़ अन्यथा शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा