शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

महसूल अधिकार्‍यांचे होणार ‘मूल्य’मापन!

By admin | Updated: September 1, 2023 14:13 IST

अशोक निंबाळकर, अहमदनगर खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांप्रमाणेच सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना आता ‘परफॉर्मन्स’ द्यावा लागणार आहे.

अशोक निंबाळकर, अहमदनगर खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांप्रमाणेच सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना आता ‘परफॉर्मन्स’ द्यावा लागणार आहे. त्यावरच त्यांच्या ‘प्रगतिपुस्तका’चा आलेख अवलंबून राहील. ‘मूल्य’ घसरलेल्यांच्या ‘सर्व्हिस बुकात’ तशी नोंद होईल. या ‘मूल्य’मापनाचा कामचुकारांनी चांगलाच धसका घेतला आहे. स्वमूल्यमापनाची ही पद्धत नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी जिल्हा प्रशासनात आणली आहे. त्यांनी पुणे जि.प.त सीईओ असताना असेच उपक्रम राबविले होते. प्रशासन गतिमान व्हावे आणि सर्वसामान्यांची पिळवणूक थांबावी हा त्यामागे उद्देश आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अव्वल कारकून, सर्कल आणि तलाठ्यांनाही या मूल्यमापनास सामोरे जावे लागेल. येत्या १ जूनपासून त्यांच्या कामांचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले आहे. एखाद्या कामासाठी किती वेळ, किती दिवस लागतील. त्यासाठी कोणती कागदपत्रे अपेक्षित आहेत. काम कोणत्या कार्यालयात होईल. याची माहिती नागरिकांना दिली जाईल. यासाठीही आराखडा तयार आहे. काम न झाल्यास संबंधित अधिकार्‍यास जाब विचारला जाईल. असा ठरेल स्कोअर योजना राबविणे, महसूल वसुली, जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण प्रयोग आदी १५ कामांसाठी गुणांक ठरवून दिले आहे. त्याप्रमाणे काम न झाल्यास गुण कमी होतील. अधिकारी नागरिकांशी कसे वागतात यासाठीही गुण आहेत. साप्ताहिक बैठकीद्वारे कामांचा आढावा, दप्तर तपासणी केली जाईल. वर्षाच्या शेवटी संबंधितांनीच कामाचे स्वमूल्यमापन करायचे आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सर्वांचे प्रगतीपुस्तक तपासतील. परफॉर्मन्स देणार्‍यास ‘बक्षिसी’ आणि घसरलेल्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल. कौतुकाची बाब - अण्णा नागरिकांना कायदे माहिती नसतात. त्यामुळे सरकारी अधिकारी त्यांची अडवणूक करतात. हे टाळण्यासाठी लोकपालसह ‘नागरिकांची सनद’ची मागणी आहे. नगरचे जिल्हाधिकारी कवडे त्याची अंमलबजावणी करीत असतील तर कौतुकाची बाब आहे. मात्र, सर्व जिल्हाधिकार्‍यांनी असा प्रयोग करायला हवा. तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नागरिकांचे हेलपाटे वाचतील, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले़ एक कोटीचा खर्च क्रयशक्ती वाढविण्यासाठी सुविधा पुरविण्यात येतील. मानसिकता बदलासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील. त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी खासगी संस्था सर्व्हे करणार आहे. हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी सुमारे एक कोटी रूपयांची आवश्यकता आहे. तो निधी डीपीडीसीतून उपलब्ध केला जाईल. हा उपक्रम सरकारी नियमानुसार आहे, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले़