शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनच वाळूतस्करीचे भागीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:46 IST

जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठेके काढून अवैध वाळू उपशाला प्रोत्साहन दिले जात आहे. तहसीलदारांना दिलेली माहिती काही क्षणात ठेकेदारांपर्यंत पोहोचते याचा अनुभव आज ‘लोकमत’नेच घेतला. 

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची ठेकेदारांशी मिलीभगत भानुदास पालवे, खनिकर्म अधिकारी बामणे यांचे अवैध उपशाकडे दुर्लक्षनदीत पाणी असतानाही वाळूचे लिलाव राहुरी तालुक्यातील प्रकारतहसीलदारच देतात ठेकेदारांना माहिती

सुधीर लंकेअहमदनगर : जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठेके काढून अवैध वाळू उपशाला प्रोत्साहन दिले जात आहे. तहसीलदारांना दिलेली माहिती काही क्षणात ठेकेदारांपर्यंत पोहोचते याचा अनुभव आज ‘लोकमत’नेच घेतला. श्रीगोंदा तालुक्यात भीमा नदीपात्रात पाणी असतानाही महसूल प्रशासनाने वाळूचा लिलाव केला होता. नदीत पाणी असताना वाळू उपसता येत नाही. असे असताना अजनूज येथे ठेकेदारांनी यांत्रिक बोटी लावून उपसा सुरु केला. याबाबत ‘लोकमत’मध्ये पुराव्यांसह वृत्त प्रकाशित होताच उपसा बंद करण्यात आला. अर्थात यांत्रिक बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे आढळले नाही, अशी सारवासारव तेव्हा महसूल प्रशासनाने केली.  सध्याही राहुरी तालुक्यात मुळा नदीपात्रात पाणी आहे. असे असतानाही महसूल प्रशासनाने बारागाव नांदूर व इतर ठिकाणचे लिलाव काढले. पाणी असतानाही हा वाळूउपसा सुरु झाला आहे. याकडे तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारीही सोयीस्कर कानाडोळा करताना दिसत आहेत. यासंदर्भात काही नागरिकांनी ‘लोकमत’ला माहिती कळवली. बारागाव नांदूरला उपसा सुरु आहे का? याबाबत ‘लोकमत’ने तहसीलदारांकडे विचारणा करताच काही क्षणात उपसा बंद झाला. या उपशाबाबत कारवाई काय झाली हे समजू शकले नाही, मात्र ‘लोकमत’ने तहसीलदारांकडे तक्रार केल्याची बाब संबंधित यंत्रणेपर्यंत तत्काळ पोहोचली होती. 

बारागाव नांदूर येथे वाळूउपसा सुरु असल्याची छायाचित्रे ‘लोकमत’ला मिळाली होती. ही बाब ‘लोकमत’ने बुधवारी दुपारी राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर काही काळातच कारवाई न होता वाळूउपसा बंद झाला. तहसीलदारांना दिलेली माहिती ठेकेदारापर्यंत कशी पोहोचली ? असा प्रश्न यातून निर्माण होतो.याबाबत तहसीलदार दौंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रात्रीपर्यंत त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही. ‘अधिकारीच वाळू ठेकेदारांना मिळाले आहेत का?’ असा प्रश्न ‘लोकमत’ने अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना केला असता त्यांनीही बोलण्याचे टाळत फोन बंद केला.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नमहसूल प्रशासनाला मिळणारी माहिती तहसीलदारांकडून गोपनीय राहत नसेल तर कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न आहे. नागरिकांच्या जीवितालाही यातून धोका आहे. वाळूतस्करांकडून हल्ले झाले की अधिकारी संघटितपणे ओरड करतात. मात्र, वाळूच्या उत्खननाबाबत महसूल प्रशासनाला मिळणारी माहिती बाहेर जाते कशी? याबाबत जिल्हाधिका-यांपासून कुणीही शहानिशा करत नाही. पोलीसही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारीRahuriराहुरी