शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी शेवगावमध्ये मेंढ्यांसह मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 14:50 IST

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षण प्रवर्गात समावेश करण्यात येऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचया मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजबांधवांनी काठी अन् घोंगडं घेऊन भंडाऱ्याची उधळण करीत मेंढ्यांसह मोर्चाने शेवगावच्या तहसील कार्यालयावर धडक मारली.

शेवगाव : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षण प्रवर्गात समावेश करण्यात येऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचया मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजबांधवांनी काठी अन् घोंगडं घेऊन भंडाऱ्याची उधळण करीत मेंढ्यांसह मोर्चाने शेवगावच्या तहसील कार्यालयावर धडक मारली.शेवगाव शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या मोर्चात मेंढ्या घेऊन धनगर समाजबांधव प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. शहरातील खंडोबानगर परिसरातील खंडोबा मंदिरापासून या मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा बाजारपेठ, शिवाजी चौक, क्रांती चौक, आंबेडकर चौक, गाडगेबाबा चौक या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर पोहचला. तहसीलच्या परिसरात मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.काठी, घोंगड्या व मेंढ्यासह भंडा-याची उधळण करीत निघालेला हा मोर्चा शेवगावकरांच्या चर्चेचा विषय बनला होता. निवृत्ती दातीर, आत्माराम कुंडकर, विनायक नजन, माणिकराव निर्मळ, बापूसाहेब तुतारे, शहादेव चितळकर, आदिनाथ खोसे, जगन्नाथ गावडे, आबासाहेब मिसाळ, महेश नवले, कारभारी नजन, सदाशिव आरगडे, भगवान दातीर, हरिभाऊ नजन, महेश नजन आदींनी आपल्या भाषणातून समाजबांधवांची ही महत्त्वपूर्ण मागणी तातडीने मान्य करून संपूर्ण समाजाला दिलासा देण्याची मागणी केली.‘येळकोट, येळकोट..जय मल्हार’ ने परिसर दणाणलाया जाहीर सभेत विविध मान्यवरांनी धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समाजाचा अनुसूचित जमाती आरक्षण प्रवर्गात समावेश होण्याची नितांत गरज व्यक्त केली. येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं आदी घोषणांनी शेवगाव तहसीलचा परिसर दणाणून गेला होता.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव