श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालातून आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते या नेत्यांच्या फोटोंना कात्री लावण्यात आली आहे. कारखाना वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. कारखान्याच्या यापूर्वीच्या अहवालात राहुल जगताप, बबनराव पाचपुते या दोघांना स्थान होते. यंदा मात्र कारखान्याने खर्चातील काटकसरीच्या धोरणाबरोबर नेत्यांचे फोटो कमी करण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही फोटो या अहवालात नाहीत. श्रीगोंदा बाजार समिती निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीत नागवडे व जगताप गटाची आघाडी होणार असल्याचे संकेत आहेत. मात्र नागवडे गटाने यावर अबोला पवित्रा घेतला आहे. या प्रकाराची कुकडी साखर कारखाना वर्तुळासह तालुक्यात जोरदार चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)
अहवालातून आजी-माजी आमदारांची छबी गायब
By admin | Updated: September 27, 2016 23:58 IST