शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

झगडे फाटा परिसरात लोकवर्गणीतून चाऱ्यांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे झगडे फाटा परिसरात नऊ चारी वाहते. जवळपास शंभर एकर भरणे असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ...

चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे झगडे फाटा परिसरात नऊ चारी वाहते. जवळपास शंभर एकर भरणे असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून नवचारीची पोटचारी जेसीबी मशीनने उकरण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी याचे काम सुरू झाले आहे.

पाटबंधारे विभागाने या चाऱ्यांची दुरुस्ती करायला हवी. मात्र, त्यांनी याकडे पूर्ण कानाडोळा केला आहे. चढाचा फाटा म्हणून ओळख असलेल्या चारीचे काम शनिवारी लोकवर्गणीतून सुरू झाले. लाभक्षेत्रातील शेतकरी व्ही. टी. होन, कल्याण होन, भिमाजी होन, अरूण होन, भीमभाऊ होन, किरण होन, चंद्रकांत होन, राजेंद्र जगताप, पांडुरंग होन यांनी एकत्रित येत लोकवर्गणीतून चारीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी लोकवर्गणी गोळा केली.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे झगडे फाटा परिसरात गोदावरी उजव्या कालव्याची नऊ चारी वाहते. गोदावरी कालव्याला जवळपास शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे चाऱ्यांची अवस्था काय असेल, हे सांगायलाच नको. गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मेन चाऱ्याची अवस्था वाईट आहे. मात्र, पोटचारी पूर्णत: नादुरुस्त झाली आहे. या चारीने शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पाटबंधारे विभागाने दिलेले पाणी या पोटचारीतून अनेक शेतात गळती होऊन नेले जाते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी आणायचे म्हटले की, मोठा प्रश्न निर्माण होतो. या सर्व गोष्टी पाटबंधारे विभागाने करणे आवश्यक आहेत. मात्र, पाटबंधारे विभाग केवळ सात नंबर फाॅर्म भरून घेण्यातच मश्गुल असतो. आधी पाटपाणी बाकी मग सात नंबर अर्ज स्वीकारला जातो, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

...

कारखान्यांमार्फत होत चाऱ्यांची दुरुस्ती

पूर्वी कोपरगाव तालुक्याची कामधेनू म्हणून ओळख असलेले सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यांमार्फत कारखान्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर ही कामे केली जायची. जास्तीत जास्त तालुक्‍यात ७ नंबर फार्म कसे भरले जातील, हे देखील कारखान्यावर ठरवले जायचे. त्यामुळेच या परिसरात ऊस क्षेत्र जास्त असायचे. मात्र, याकडेही आता दुर्लक्ष झाले आहे, असे शेतकरी व्ही. टी. होन, भिमाजी होन यांनी सांगितले.