शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पथकावर हल्ला करणा-या आरोपीला सोडले; दारूबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:11 IST

राहुरी तालुक्यातील फॅक्टरी येथे दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला केल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. ताब्यात घेतलेला आरोपी काही वेळातच सोडून देण्यात आला. या प्रकरणी फॅक्टरी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या दालनासमोर मंगळवारी (७ जुलै) ठिय्या आंदोलन करून पोलिसांना जाब विचारला.

राहुरी : तालुक्यातील फॅक्टरी येथे दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला केल्याची घटना ६ जुलै रोजी घडली आहे. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. ताब्यात घेतलेला आरोपी काही वेळातच सोडून देण्यात आला. या प्रकरणी फॅक्टरी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या दालनासमोर मंगळवारी (७ जुलै) ठिय्या आंदोलन करून पोलिसांना जाब विचारला.

 राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्षा रजनी कांबळे  आणि आरपीआयच्या महिला जिल्हाध्यक्षा शालिनी पंडीत यांच्या नेतृत्वाखाली पंधरा दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगर येथे सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, या मागणीसाठी फॅक्टरी परिसरातील महिलांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. सदर अवैध धंदे तत्काळ बंद करून बीट पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. 

 ६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व काही पोलीस कर्मचारी फॅक्टरी येथील प्रसाद नगर येथे कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी अवैध धंदे करणा-यांनी पोलीस पथकावर हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळातच त्याला सोडून देण्यात आले. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही.

 सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. फॅक्टरी परिसरातील अवैध धंदे दोन दिवसांत पूर्णपणे बंद होतील. अशी ग्वाही पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी दिली. मात्र फॅक्टरी परिसरातील अवैध धंदे तत्काळ बंद झाले नाहीतर भविष्यात राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन, आरपीआय संघटना, इतर संघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा  यावेळी महिलांनी दिला आहे. 

         

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी