शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

विधवा-विधुरांच्या जुळणार रेशीमगाठी!

By admin | Updated: January 12, 2015 13:44 IST

प्रथम वर-वधुंच्या परिचय मेळाव्याची सगळीकडेच धूम असते. मात्र अकाली वैधव्य-विधुरत्व आलेले समाजात दुर्लक्षित राहतात. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कोणालाच वेळ नसतो.

पद्मशाली समाजाचा पुढाकार : एकटेपणाचे जीवन पुन्हा आनंदाने बहरणार

अहमदनगर -  प्रथम वर-वधुंच्या परिचय मेळाव्याची सगळीकडेच धूम असते. मात्र अकाली वैधव्य-विधुरत्व आलेले समाजात दुर्लक्षित राहतात. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कोणालाच वेळ नसतो. जोडीदाराच्या कायमच्या जाण्यामुळे एकटेपणाचे जीवन त्यांच्या वाट्याला येते. अशा दुर्लक्षितांच्या जीवनात पुन्हा आनंद फुलविण्यासाठी पद्मशाली समाजाने पुढाकार घेतला आहे. विधवा-विधुरांच्या रेशीमगाठी जुळविण्यासाठी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.पद्मशाली समाजाचे महाराष्ट्रात बहुतांश शहरांमध्ये वास्तव्य आहे. राज्यात १६ ते १७ लाख एवढी पद्मशाली समाजाची लोकसंख्या आहे. मिळेल तिथे काम करणे,हा त्यांचा स्वभावगुण! कापड व्यवसाय, विडी काम यामध्ये पद्मशाली समाजाचे मोठे योगदान आहे. शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज बराच मागे आहे. इतर समाजाप्रमाणेच वधु-वरांचे मेळावे घेण्याचे काम या समाजातील कार्यकर्ते जोमाने करीत आहेत. पहिल्यांदा ज्यांचे लग्न होते, त्यांच्यासाठी सर्वच काम करतात. ज्यांना अकाली वैधव्य, विधुरत्व आले आहे, ते एका कोपर्‍यात राहतात. पुन्हा लग्न करायचे की नाही, असा विषय काढण्याची अनेकांना चोरी वाटते. पुरोगामीत्वाचे कितीही डांगोरे पिटले तरी पुनर्विवाह हा विषय अजूनही तसा दुर्लक्षितच आहे. पिंपरी-चिंचवड येथील प्रा. सदानंद बोगम यांनी नुकतीच पुनर्विवाह संस्था स्थापन करून पद्मशाली समाजातील दुर्लक्षितांच्या रेशीमगाठी जुळविण्याचे काम हाती घेतले आहे. बोगम यांनी पद्मशाली समाजाची नगरला बैठक घेऊन पुनर्विवाह मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा मेळावा ८ फेब्रुवारी २0१५ रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. या मेळाव्याबाबत महाराष्ट्र पद्मशाली वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष अंबादास चिट्टय़ाल म्हणाले, कोणाचा जावई गेला, कोणाची लेक गेली, कोणाचा अपघात झाला, तर कोणाचा घटस्फोट झाला, कोणी कोणाला टाकून दिले, अशा वार्ता कानावर रोजच आदळत होत्या. अशा घटनांमुळे संबंधित कुटुंबाची वाताहत झालेली बघून मन व्यथित झाले. ज्यांचा आधार गेला, असे किती लोक आहेत, याचा शोध घेतला. आधी काहीच सांगण्यास नकार देणारे आता स्वत: पुढे येऊन विवाहाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांचे, त्यांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करून दुसर्‍या विवाहासाठी अनेकांना तयार केले. त्यानंतर इच्छुकांची संख्या वाढत गेल्याने मेळावा आयोजित करण्याचा विचार पुढे आला. 

 पिंपरी चिंचवडला होणारा पुनर्विवाह इच्छुकांचा पहिला मेळावा आहे. हा मेळावा फक्त पद्मशाली समाजातील लोकांसाठीच आहे. यापुढे अशा मेळाव्यांचे स्वरुप व्यापकपणे हाती घेतले जाणार आहे. सर्वच समाजातील विधवा-विदुरांची लग्ने जुळविण्यासाठी कार्य हाती घेण्यात येणार आहे. असा मेळावा पुढील सहा महिन्यात नगरला करण्याचे नियोजन आहे.- अंबादास चिट्टय़ाल, ज्येष्ठ कार्यकर्ते, अहमदनगर राज्यामध्येही असा इच्छुकांचा शोध सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुनर्विवाह मेळाव्याची पूर्वतयारी सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नगरमध्ये पद्मशाली समाजाची लोकसंख्या ५0 हजार एवढी आहे. सर्वात जास्त पुनर्विवाह इच्छुकांची नोंदणी (९५ जणांची) नगरमध्ये झाली. त्यामध्ये ६0 पुरुष आणि ३५ स्त्रिया आहेत. विधुर-विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता यांचा शोध घेणे, त्यांच्यात जागृती करून त्यांच्या रेशीमगाठी जुळवून आणणे यासाठी प्रयत्न आहेत.- प्रा. सदानंद बोगम, पुनर्विवाह संस्था, पिंपरी-चिंचवड सुदाम देशमुख■