शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पारो’, ‘अनाहूत’ लघुपटांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 15:06 IST

अहमदनगर येथील ११ व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात रोहतक (हरियाणा) येथील विजय कुमार यांच्या ‘पारो’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला.

अहमदनगर : अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभाग आयोजित ११ व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय लघुपट व माहितीपट स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात रोहतक (हरियाणा) येथील विजय कुमार यांच्या ‘पारो’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. खुल्या गटामध्ये कोल्हापूर येथील उमेश बगाडे यांच्या अनाहूत या लघुपटाने बाजी मारली. माहितीपट स्पर्धेमध्ये मुंबई येथील वैशाली केंदळे यांच्या ‘चेसिंग ड्रिम्स’ या माहितीपटाला प्रथम क्रमांक मिळाला.प्रसिद्ध सिने छायाचित्रकार धरम गुलाटी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे उपस्थित होते. महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात चार दिवस चाललेल्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी समाधान व्यक्त केले. सिनेमा हा सर्व कलांचा समुच्चय असून, हा महोत्सव ग्रामीण भागातील कलावंतांचे नेतृत्व करतो, असे मत धरम गुलाटी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संज्ञापन अभ्यास विभागप्रमुख प्रा. बापू चंदनशिवे यांनी केले. यावेळी संस्थेच्या सचिव अ‍ॅड. दीपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे व प्रा. गिरीश कुकरेजा यांनी मनोगत व्यक्त केले.उपप्राचार्य प्रा. आर. जी. कोल्हे, तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन करण गाभणे याने केले, तर आभार चित्रपट महोत्सवाचे संचालक प्रा. राहुल चौधरी यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल

लघुपट स्पर्धा- विद्यार्थी गट : प्रथम क्रमांक- पारो (दिग्दर्शक- विजय कुमार) रोहतकद्वितीय- निशब्द (दिग्दर्शक- मिलिंद विसपुते)- पुणेतृतीय- ब्युटी (दिग्दर्शक- प्रवीण खाडे)- अहमदनगरउत्कृष्ट दिग्दर्शक- विजय कुमार (पारो)उत्कृष्ट छायाचित्रकार- शशांक विराग (पारो)उत्कृष्ट संकलक- शुभम सेवाइवार (मरियम)

लघुपट स्पर्धा- खुला गट :

प्रथम- अनाहूत (दिग्दर्शक- उमेश बगाडे)- कोल्हापूरद्वितीय- मयत (दिग्दर्शक- सुयश शिंदे)- पुणेतृतीय- पोस्ट मॉर्टेम (दिग्दर्शक- विनोद कांबळे)- मुंबईउत्कृष्ट दिग्दर्शक- उमेश बगाडे (अनाहूत)उत्कृष्ट छायाचित्रकार- सुरजोदीप घोष (पाओ ना पाओ)उत्कृष्ट संकलक- सौरभ देसाई (अनाहूत)

माहितीपट स्पर्धा

प्रथम- चेसिंग ड्रिम्स (दिग्दर्शक- वैशाली केंदळे)- मुंबईउत्तेजनार्थ- मेरा शडवाल (दिग्दर्शक- मोहन धुलधर)- पुणे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर