शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बरा झालेल्या दुस-या कोरोना रूग्णाचे नेवाशात टाळ्या वाजवून स्वागत; कुटुंबाला सांभाळल्याबद्दल मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:22 IST

नगर येथील सरकारी रुग्णालयातून बरा झालेला दुसरा रुग्ण शनिवारी नेवासा येथे पोहोचला. यावेळी रुग्ण रहात असलेल्या कॉलनीतील रहिवाश्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. गाडीतून उतरल्यावर रुग्णाने चौदा दिवसात माझ्या कुटुंबाला सांभाळल्याबद्दल आपल्या कॉलनीचे सर्वांचे आभार मानले.

नेवासा : नगर येथील सरकारी रुग्णालयातून बरा झालेला दुसरा रुग्ण शनिवारी नेवासा येथे पोहोचला. यावेळी रुग्ण रहात असलेल्या कॉलनीतील रहिवाश्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. गाडीतून उतरल्यावर रुग्णाने चौदा दिवसात माझ्या कुटुंबाला सांभाळल्याबद्दल आपल्या कॉलनीचे सर्वांचे आभार मानले.नेवासा येथील सदरचा रुग्ण हा १९ मार्च रोजी पॉझिटिव्ह निघाला होता. तेव्हापासून नगर जिल्ह्यात प्रशासनाने सर्वात जास्त काळजी घेण्यास सुरुवात केली. नेवासा शहरासह जिल्ह्यात लॉकडाउन झाले. १९ तारखेपासून आजपर्यंत नेवासा शहर ही बंद आहे. त्यात आता दहा विदेशी नागरिकांना तपासणीसाठी पाठवले आहेत. तर नेवासा येथे विशेष पोलीस दल दाखल झाले. शनिवारी सदरचा रुग्णाचा १४ आणि १५ व्या दिवशी झालेल्या दोन चाचण्यांमध्ये निगेटिव्ह निघाला. त्यांना नगरच्या बूथ हॉस्पिटलमधून शुक्रवारी नेवासा येथे घरी पाठवण्यात आले. ठणठणीत बरा झालेला आपला शेजारी येणार म्हणून कॉलनीतील वातावरण उत्साहाचे होते. या कॉलनीतील सर्वं घरांवर प्रशासनाचे विशेष लक्ष होते. कॉलनीतील सर्वांना १४ दिवस होम कॉरंटाईन केले होते. ही विशेष दक्षता आता सर्व नेवासा शहरात पाळण्यात येत आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता रुग्णवाहिका कॉलनीत आल्यावर कॉलनीतील सर्व घरांमधून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. कॉलनीतील शेजाºयांनी आपले केलेले स्वागत करून बरा झालेल्या रुग्णालाही गहिवरून आले. 

प्रथम पॉझिटिव्ह निघालो. धक्का बसला होता. माझ्या संपर्कात आलेले सर्वांचीच काळजी वाटायला लागली होती. मला त्रास होत नव्हता, पण जेव्हा माझ्या बरोबर कुटुंबीय व संपर्क आलेल्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जीव भांड्यात पडला. या दरम्यान प्रत्येक चाचणीला टेन्शन असायचेच. पण आपल्याकडची आरोग्य व्यवस्था डॉक्टर यांचे चांगले सहकार्य व लक्ष आहे. दवाखान्यामध्ये अत्यंत चांगल्या सुविधा आहेत. भारतात या रोगातून लोक बरे होत असताना घाबरून जाऊ नये. मात्र काळजी घेणे गरजेचे असल्याचे  या रुग्णाने सांगितले. कोरोना झालेल्या रुग्णाला मानसिक आधाराची जास्त गरज आहे. असे स्पष्ट करताना दवाखान्यांमध्ये देखील मानसोपचार तज्ज्ञाची नेमणूक असावी, असे त्यांनी सांगितले. त्यांना मानसिक आधार दिलेल्या सर्व मेडिकल्स स्टाफ, पोलीस अधिकारी, कर्मचारी, मित्र मंडळ व नातेवाईकांचे त्यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल