शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मोहटा देवस्थानच्या विश्वस्तांवर ठपका; फेरनिवडीला घेतला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:55 IST

मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु आहे. निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत देवस्थानच्या काही विश्वस्तांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

अहमदनगर : मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराची धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी सुरु आहे. निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत देवस्थानच्या काही विश्वस्तांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे फेरनिवडीत अशा विश्वस्तांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी देवस्थानचे माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे केली आहे.मोहटा देवी विश्वस्त मंडळाचा कार्यभार २४ नोव्हेंबर रोजी संपत आहे. देवस्थानच्या पंधरा विश्वस्तांपैकी दहा विश्वस्तांची निवड ही जिल्हा न्यायालयामार्फत केली जाते. ती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी अनेकांनी अर्जही दाखल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गरड यांनी जिल्हा न्यायालयाला लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, २०१३ ते २०१६ या काळात देवस्थानमध्ये झालेल्या गैरप्रकारांबाबत आपण धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. या तक्रारीवर चौकशी सुरु आहे. धर्मादाय उपआयुक्त कार्यालयातील निरीक्षकांनी केलेल्या चौकशीत काही बाबींत अनियमितता असल्याचेही समोर आले आहे. तसा अहवाल निरीक्षकांनी दिला आहे. काही विश्वस्तांनी या चौकशीत अजिबातही सहकार्य केले नाही. ते चौकशीला हजर राहिले नाही, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. काही विद्यमान विश्वस्तांनी धमकीची भाषा चौकशी समितीला वापरलेली आहे. ती नावेही अहवालात नमूद आहेत. या अहवालावर उपआयुक्तांनी पुन्हा ४१ ब खाली चौकशी सुरु केली आहे. विद्यमान विश्वस्तांपैकी काहींनी फेरनियुक्तीसाठी अर्ज सादर केले असण्याची शक्यता आहे. मात्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अहवाल पाहिला तर विद्यमान विश्वस्तांची फेरनिवड का करावी, असा प्रश्न निर्माण होतो.  त्यामुळे निवड प्रक्रियेत या बाबीचा विचार व्हावा, असे गरड यांचे म्हणणे आहे. देवस्थानमधील अनियमिततेबाबत फौजदारी कारवाई व्हावी याबाबत गरड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केलेली आहे. ती याचिकाही अंतिम टप्प्यात असल्याकडे प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे लक्ष वेधण्यात आले आहे. काही विश्वस्तांना वारंवार संधी मोहटा देवस्थानवर काही विश्वस्तांना पुन्हा पुन्हा संधी मिळालेली दिसते. या विश्वस्तांची निवड ही न्यायालयामार्फत होते. एकाच व्यक्तीची वारंवार निवड झाल्यास अशा व्यक्तींचे जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकाºयांशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात, असाही मुद्दा या निवड प्रक्रियेत उपस्थित होऊ शकतो. पदसिद्ध विश्वस्त चौकशीला गैरहजरमोहटा देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश, पाथर्डी येथील दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच उपवनसंरक्षक हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. मात्र, ते कधीही चौकशीला उपस्थित राहिले नाहीत, असेही निरीक्षकांनी अहवालात नमूद केले आहे. उर्वरित विश्वस्तांपैकी केवळ हर्षवर्धन पालवे हे उपस्थित रहायचे. त्यांनी तत्कालीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बाजूने जबाब दिलेले आहेत. कर्मचारी भरतीत तत्कालीन अध्यक्षांनी अधिकचे गुण दिलेले असतानाही पालवे यांनी त्यांचे चौकशीत समर्थन केले, असे निरीक्षण चौकशी अहवालात आहे. कोणते विश्वस्त बैठकांना उपस्थित असतात व कोण गैरहजर असतात याचा प्रोसिडिंग बुकवरुन बोध होत नाही, असाही ठपका या अहवालात आहे. अध्यक्षांनी कर्मचारी भरतीत अधिकाराचा दुरुपयोग केला हे गंभीर निरीक्षण निरीक्षकांनी नोंदविलेले आहे. 

टॅग्स :Pathardiपाथर्डीTempleमंदिर