पळवे : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण ग्रामपंचायत उपसरपंचपदी रवींद्र श्रीधर शेळके यांची बिनविरोध निवड झाली. एकच अर्ज दाखल झाल्याने शेळके यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी जी. एस. धाडवे यांनी काम पाहिले. माजी उपसरपंच उद्धव शेळके यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही निवड करण्यात आली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच उद्धव शेळके, माजी सरपंच संध्या शेळके, सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद घनवट, संतोष शेळके, संदीप शेळके, तुषार पवार, ग्रामपंचायत सदस्य गणेश सोनवणे, मंगल शेळके, यमुना सोनवणे, सुरेखा रासकर, सपना झांबरे, किरण सोनवणे, नंदू रणदिवे, सुमित सोनवणे उपस्थित होते.
---
१५ वाडेगव्हाण
वाडेगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची निवड झाल्यानंतर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.