शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

पावसाचा रतनवाडीने मोडला घाटघरचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 18:18 IST

नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या घाटघरच्या एकूण पावसाचा विक्रम यावर्षी रतनवाडीने मोडीत काढला.

राजूर : नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या घाटघरच्या एकूण पावसाचा विक्रम यावर्षी रतनवाडीने मोडीत काढला. यावर्षी रतनवाडी येथे बुधवारपर्यंत सुमारे साडेसहा हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांची एकूण पावसाची नोंद पाहता यावर्षी रतनवाडीत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.सह्याद्रीच्या पर्वत रांगात रतनवाडी हे एक आदिवासी खेडे. निसर्ग आणि पर्यटनदृष्ट्या संपन्नतेचा वारसा असणा-या रतनवाडी गावाला यावर्षी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जूनच्या अखेरीस उशिराने पावसाचे आगमन झाले. तरीही बुधवारी सकाळी येथे ६ हजार ४४९ मिमी एवढा विक्रमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात ३८६ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यात रतनवाडी परिसराला चार ते पाच वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला. या दोन महिन्यात तब्बल ५ हजार २६५ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्याच्या अकरा दिवसात येथे ८१२ मिमी पावसाची नोंद झाली. अद्यापही येथे पाऊस पडत आहे.जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणा-या भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे अनेक वेळा सहा हजार मिमीहून अधिक पावसाची अद्यापपर्यंत नोंद झाली आहे. २००५ साली तर तेथे तब्बल ७ हजार १०९ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. २००६ मध्येही तेथे ६ हजार ८५९ मिमी, २००८ मध्ये ६ हजार २७ मिमी पाऊस पडला होता. या वर्षीही बुधवारपर्यंत ६ हजार १६०  मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारदºयात ४ हजार ५३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अद्यापपर्यंत भंडारदरा येथे मागील चाळीस वर्षांत ४ हजार ५४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. पाणलोटातील पांजरे येथे बुधवारपर्यंत ४ हजार ७०५ मिमी  तर वाकी येथे ३ हजार ८०७ मिमी पावसाची आजपर्यंत नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस