अहमदनगर : माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
यावेळी सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, माजी महापौर भगवान फुलसौदर, अनिल शिंदे, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड, विक्रम राठोड, दत्ता कावरे, संजय शेंडगे, अनिल लोखंडे, पारुनाथ ढोकळे, अशोक दहिफळे, डॉ. श्रीकांत चेमटे, रमेश परतानी आदिनाथ मेहर, संतोष डमाळे, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शहरप्रमुख सातपुते म्हणाले, की प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. नियमित तपासणी केल्यास आजार टाळता येतात.
....
फोटो: १४ सातपुते नावाने आहे.
फोटो ओळी: माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे आदी.