शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

राठोडांना झोपता, उठता, बसता राष्ट्रवादीच दिसते : आमदार संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 19:09 IST

शिवसेनेने महापौर करण्यासाठी आमच्या वरिष्ठांशी सातत्याने संपर्क केला होता. संपर्क केल्याची कबुली शिवसेनेच्या काही नेत्यांनी दिली.

अहमदनगर : शिवसेनेने महापौर करण्यासाठी आमच्या वरिष्ठांशी सातत्याने संपर्क केला होता. संपर्क केल्याची कबुली शिवसेनेच्या काही नेत्यांनी दिली. अचानक झालेल्या निर्णयामुळे आम्ही भाजपाला पाठिंबा देण्याचे ठरले. त्यामुळे जास्त जागा मिळवूनही शिवसेनेचे महापौरपद गेले. त्यामुळे उपनेते अनिल राठोड अस्वस्थ झाले आहे, त्यांना झोपता, उठता, बसता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप समोर दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.आमदार जगताप म्हणाले,आम्ही भाजपला पाठिंबा का दिला आहे. मी, नगरसेवकांनी मिळून नगरच्या विकासासाठी हा निर्ण़य घेतला आहे. पक्ष आमच्यावर कारवाई करेल, नाही करेल. मी आमदारकीचा राजीनामा द्यायचा की नाही. हे आमचे आम्ही ठरवू. आम्हाला शहाणपणा शिवसेनेने शिकवू नये. उपनेते दाखला किंवा आयएसओ प्रमाणपत्र देण्यासाठी कोण लागून गेले. आमच्या पक्षामधील ही बाब आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षातील बाबीत लक्ष घालू नका. तुम्ही शिंगावर घेण्याची भाषा करत आहात. २५ वर्ष आमदार राहिल्यानंतर तुम्हाला काही न करता आल्याने गेल्या निवडणुकीत लोकांनीच तुम्हाला शिंगावर घेतले आहे. पुन्हा घोडेमैदान जवळ आले आहे. त्यासाठी तयार राहा, असेही जगताप म्हणाले.शहरात शिवसेनेची पिछेहाट झाल्याने त्यांनी फक्त राष्ट्रवादीला टारगेट करण्याचा धंदा सुरु केला आहे. आपल्या स्वत:च्या पक्षात काय चालले आहे हे राठोेडांनी पाहावे. कोणता शिवसैनिक मोठा केला हेही सांगावे. अनेक लोकांचे संसार उद्धवस्त करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहरातील उद्योगाची हानी शिवसेनेमुळे झाली. ११ महिन्यांतच तुमचे मंत्रीपद बाळासाहेब ठाकरे यांनी का काढून घेतले. हे लोकांना माहित आहे. तसेच उपनेते असून देखील जिल्ह्यात व शहरात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांनी काय योगदान दिले. हे सांगावे. त्यामुळे त्यांनी मला तरी पक्षनिष्ठा शिकवू नये, असे संग्राम जगताप म्हणाले. शिवसेना आज सत्तेत आहे.त्यांच्याकडे उद्योग व परिवहन खाते आहे. मात्र, राठोड हे नगरच्या तरुणांना उद्योगधंदा मिळावा यासाठी मंत्र्यांना निमंत्रित करणार नाही, किंवा शहराची बस व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार नाही. पण एखाद्या गुन्हाला राजकीय वळण देण्यासाठी सगळ्यांची मदत घेतली असा आरोप देखील जगताप यांनी केला.आम्ही पैशासाठी पाठिंबा दिला अशी नवी अफवा सुरू आहे. पूर्वी केडगाव हत्याकांडातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा दिला आहे, असेही आरोप करण्यात आले. महापौरपद गेल्याने राठोड बावचळले आहेत. नेमका काय आरोप करावा हेही त्यांना कळत नाही. याउलट शिवसेनेनेचा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मागणी केली होती. मात्र, तो प्रस्ताव आम्ही नाकारला. त्यामुळे सत्ता गेली. म्हणून त्यांना झोपेत, उठता,बसता, रात्रंदिवस राष्ट्रवादीच दिसत आहे, असेही जगताप म्हणाले.भाजपात जाणार नाहीभाजपाला पाठिंबा दिल्याने पक्ष करेल त्या कारवाईला आम्ही सामोरे जाणार आहोत. मात्र मी अथवा नगरसेवक कोणीही भाजपात जाणार नाही. भाजपात जायचे असते तर राष्ट्रवादी पक्ष शहरात वाढवलाच नसता. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही पक्षाबरोबर आहोत आणि पुढेही राहणार आहोत, असेही जगताप म्हणाले.केडगाव घटनेची सखोल चौकशी व्हावीकेडगावमध्ये दोघांची हत्या झाल्यानंतर योग्यवेळी उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र शिवसेनेने जाणीवपूर्वक त्यांच्यापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स पोहचवू दिली नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी दोन जीव घेतले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात कोण दोषी आहे. हे स्पष्ट होईल. असा आरोप जगताप यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला आहे.प्रसंगी भाजपचा पाठिंबा काढून घेऊनगर शहराच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. माझ्या करीअरपेक्षा शहराच्या विकासाला नेहमी प्राधान्य दिले आहे. महापौरपदाचे आमचे गणित जुळत नव्हते. शिवसेनेने आमदारकी उपभोगली, महापौरपद भोगले मात्र, शहराचा विकास त्यांनी केला नाही. पोकळ गप्पा मारल्या. त्यामुळे भाजपाला पाठिंबा दिला. भाजप चुकीचे काम करत असेल तर नक्कीच त्यांचाही पाठिंबा काढून घेऊ असे जगताप म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस