शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाद मिटविण्यासाठी खंडणी : अकरा जणांविरुद्ध शिर्डीत गुन्हा दाखल

By admin | Updated: February 18, 2017 21:43 IST

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा तिरमली समाजाची जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली.

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा तिरमली समाजाची जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली. दोन मुलींना सासरी नांदवत नसल्याने यासंदर्भात जातपंचायतीत वाद मिटविण्यासाठी दोन लाखांची मागणी केल्याच्या फिर्यादीवरुन न्यायालयाच्या आदेशाने शिर्डी पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले की, शिर्डीजवळील सावळीविहीर गावातील तिरमली समाजातील एका व्यक्तीने आपल्या दोन मुलींचे लग्न नेवासा तालुक्यातील चांदा गावातील एकाच कुटुंबातील दोन भावांशी करून दिले होते. मात्र घरात किरकोळ वाद झाल्याने या दोन्ही सख्या बहिणींना सासरच्या लोकांनी घरा बाहेर हाकलून दिले होते़ या दोन्ही बहिणी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या माहेरी राहत आहेत़दरम्यान या मुलींना सासरचे लोक नांदवत नसल्याने त्यांच्या वडिलांनी आपल्या घरी समाजाची जात पंचायत भरविली होती़ यावेळी पंचांनी हे वाद मिटविण्यासाठी या मुलींच्या वडिलांकडे दोन लाखांची मागणी केली़ यावर मुलीच्या वडिलांनी आपल्याकडून दोन लाखांची खंडणी मागण्यात येत असल्याची व जाती बाहेर काढण्याची धमकी देण्यात येत असल्याची खासगी फिर्याद राहाता न्यायालयात दाखल केली होती़

आरोपींची नावेन्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी जात पंचायत व सासर कडील अकरा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे़ यात बाळासाहेब गंगाधर शिंदे, अहिल्याबाई गंगाधर शिंदे, काशिनाथ गंगाधर शिंदे, रामा गंगाधर शिंदे, हनुमंत गंगाधर शिंदे (सर्व चांदा, ता. नेवासे), रामा साहेबराव फुलमाळी (ओझर गणपती, नारायणगाव), सुभाष हनुमंता फुलमाळी (शिंगणापूर, ता. नेवासे), गंगाधर तुकाराम फुलमाळी (भेंडा, ता. नेवासे), गंगा गंगाधर गुंडाळे (दैठण, ता. श्रीगोंदे), तात्याबा शिवराम फुलमाळी (ढोरजळगाव, गंगापूर, औरंगाबाद), उत्तम फुलमाळी (जेऊर, ता. नेवासे) आदींचा समावेश आहे़ अशाच स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी श्रीगोंदा, संगमनेर येथेही दाखल झाल्याचे सांगण्यात येते़(शहर प्रतिनिधी)