शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

रंजनकुमार शर्मा ‘गँगमन’च्या शोधात

By admin | Updated: May 3, 2017 14:48 IST

सराईत गुन्हेगारांसह संघटित गुन्हेगारांवर थेट कारवाई करणार असून, त्यासाठी जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील गुन्हेगारी गँगचा शोध घेतला

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ ३ - नगर जिल्हा विस्ताराने मोठा आणि संवेदनशिल आहे़ येणाऱ्या काळात सराईत गुन्हेगारांसह संघटित गुन्हेगारांवर थेट कारवाई करणार असून, त्यासाठी जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील गुन्हेगारी गँगचा शोध घेतला जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले़ शर्मा म्हणाले, पोलीस प्रशासनातील अस्थापन, पोलीस कल्याण यासह दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणि तत्परता याला महत्त्व देणार आहे़ चांगले काम करणाऱ्या पोलीस अधीकाऱ्यांना बक्षीस तर चुकणाऱ्याला शिक्षा हेच धोरण राहणार आहे़ जिल्ह्यात कुठे गुन्हेगारीची घटना घडली तर स्थानिक पोलीस ठाण्यातूनच त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे़ तशा सूचना देऊन थेट अंमलबजावणीही करणार आहे़ गुन्हेगारीचा प्रतिबंध, घडलेल्या घटनाचा छडा लावणे या बाबी तत्परतेने झाल्या तर अशा घटना कमी होण्यास मदत होते़ नगर शहरात आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी धूमस्टाईलने चोऱ्या करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल़ पोलीस ठाण्यात प्रलंबित असलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगत शर्मा म्हणाले पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्यांना योग्य प्रतिसाद दिला जाईल़ बहुतांशीवेळा गुन्हेगारीत सक्रिय असलेल्यांकडून इतर गुन्हेगारांची माहिती मिळत असली तरी गुन्हा करणाऱ्या कुणालाही अभय मिळणार नाही़ जिल्ह्यातील वाळूतस्करीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून एकत्रित पेट्रोलिंग करून महसूल प्रशासनाला मदत करण्यात येईल असे ते म्हणाले़ तसेच जिल्ह्यात कुठे काही गुन्हेगारीची घटना घत असले तर शर्मा यांनी त्यांचा ८८८८३१०००० हा मोबाईल क्रमांक जनतेसाठी खुला केला असून, यावर माहिती अथवा तक्रार केली तर थेट कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ गुन्हेगारी बंदोबस्ताचा नागपूर पॅटर्न नगरमध्ये नागपूरमध्ये गुन्हेगार दत्तक योजना ही संकल्पना राबविण्यात आली होती़ यामाध्यमातून गुन्हेगारीच्या घटना कमी होण्यास खूप चांगली मदत झाली़ जिल्ह्यातील सर्व सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जाते़ त्यातील गुन्हेगारांचे विभाजन करून त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविली जाते़ स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातून अशा गुन्हेगारांची यादी मागविण्याचे आदेश दिले आहेत़ या योजनेची येत्या काही दिवसांतच अंमलबजावणी होणार असल्याचे रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले़