शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रामनामाच्या गजराने साईनगरी दुमदुमली

By admin | Updated: April 4, 2017 15:39 IST

शिर्डीत रामनवमी उत्सवाची भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई दर्शनासाठी लाखो भाविकांच्या मांदीयाळीने साईनगरी फुलून गेली आहे.

आॅनलाईन लोकमतशिर्डी (अहमदनगर), दि़ ४ - शिर्डीत रामनवमी उत्सवाची भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई दर्शनासाठी लाखो भाविकांच्या मांदीयाळीने साईनगरी फुलून गेली आहे. ‘साईराम बोलो’चा जयघोष करीत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पूजा करून साईमूर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला. साईबाबांना मंगलस्नानही कावडीतून आणलेल्या जलाने करण्यात आले. दरम्यान सकाळी काकड आरतीनंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.आज मध्यान्ह आरती अगोदर साईमंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी राम जन्माचा पाळणा म्हणत मोठ्या भक्तीभावाने राम नामाचा जप केला़ शिडीर्तील रामनवमी उत्सवाच यंदाच हे १०५ वे वर्ष आहे. भाविकांमध्ये साईभेटीचा आनंद ओसंडुन वाहत आहे.साई समाधी मंदिरासमोर हनुमानांची मूर्ती असलेला ५० फुटी देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा भाविकांच लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेली महाद्वाराची प्रतिकृति भाविकांच्या आकर्षणाच केंद्रबिंदु ठरली आहे. मुंबई येथील द्वारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने ही प्रतिकृती साकारली आहे. यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसचा उपयोग करण्यात आला आहे.रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक येथे येत असतात. शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतूर झालेला भक्तगण साई मुर्तीची केवळ एक झलक पाहण्यासाठी अतुरलेला असतो. तिन दिवस चालणाऱ्या या उत्सवातील उर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते. त्यामुळेच हा उत्सव याची देही, याची डोळा अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक साई दरबारी दाखल झाले आहेत़ जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.आज अनेक भाविकांनी सार्इंना देणग्या दिल्या़ एका भाविकाने ३५ लाख किमतीचे चांदीचे मखर द्वारकामाई मंदिरासाठी दिले़ तर एकाने बारा किलो सोन्याचे कठडे समाधीला बसवले़ एका भाविकाने दोन हजाराच्या नोटांची माळ बाबांना अर्पण केली़ या हाराची किंमत दोन लाख रुपये आहे.