कर्जत/जामखेड : जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी जामखेड-कर्जत मतदारसंघातून भाजपतर्फे शक्ती प्रदर्शनात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे हे उपस्थित होते.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. दुपारी कर्जत येथे पावसानेही हजेरी लावली. राम शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना पावसामुळे येता आले नाही. परंतु दुपारनंतर पाऊस बंद झाल्याने शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन, आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. पाऊस उघडल्यानंतर राम शिंदे यांनी तहसील कार्यालयापासून रॅली काढली. या रॅलीसाठी मोठी गर्दी झाली होती. रॅलीनंतर सभास्थळीही गर्दी झाली होती.
पालकमंत्री राम शिंदे यांचा शक्तीप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:42 IST