शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनामूल्य समाजसेवा करणारे राम-लखन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

पिंपळगाव माळवी : गावातील विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीवरील फ्युज गेली, बोलवा साजिदला, मंदिरापुढील साफसफाई करायचीय बोलवा गाडे पाहुण्यांना. असाच ...

पिंपळगाव माळवी : गावातील विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीवरील फ्युज गेली, बोलवा साजिदला, मंदिरापुढील साफसफाई करायचीय बोलवा गाडे पाहुण्यांना. असाच नियमित अनुभव नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील ग्रामस्थांचा आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पिंपळगावातील साजिद पठाण व बापूसाहेब गाडे ही जोडगोळी गावातील कुठल्याही समाजसेवेच्या कामासाठी नेहमीच उभे राहते.

पिंपळगावातील असलेले विविध मंदिरे व त्याची साफसफाई याकामी बापूसाहेब गाडे नेहमीच अग्रेसर राहतात. गावातील अमरधाम येथे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी अंत्यविधी झाल्यानंतर बराचसा कचरा तसाच पडलेला असतो. बापूसाहेब गाडे नियमितपणे त्यांना वेळ मिळेल त्यावेळी अमरधाम येथे साफसफाई करतात. तसेच गावातील दुसरा युवक साजिद पठाण हादेखील गावातील विविध सामाजिक काम करण्यात अग्रेसर असतो. गावातील विविध प्रकारचे विद्युत डीपी (राेहित्र), पोलवरील दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती, विविध धार्मिक कार्यक्रमात नियमित हातभार लावतो. हे दोघेही या आपल्या कामाचा कुठलाही मोबदला घेत नाही. त्या दोघांनाही समाजसेवेची आवड असल्यामुळे कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये दत्त म्हणून हजर असतात. त्यांच्या या समाजसेवेचा कामांबद्दल या दोघांची ग्रामस्थांकडून कुठलीही अपेक्षा नसते.

....

मला लहानपणापासून समाजसेवेची आवड आहे. या कामातून मला मनस्वी आनंद मिळतो.

-साजिद पठाण,

युवक, पिंपळगाव माळवी

....

....

अमरधाम येथे अंत्यविधीनंतर बराचसा कचरा तसाच पडलेला असतो. नंतर येथे येणाऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून मी तेथे नियमित साफसफाई करतो.

-बापूसाहेब गाडे,

युवक, पिंपळगाव माळवी

फोटो ओळ २६ पिंपळगाव माळवी

पिंपळगाव माळवी येथील हनुमान मंदिरासमोरील स्वच्छता करताना बापूसाहेब गाडे व साजिद पठाण.