निविदांची छाननी
अहमदनगर : महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या निविदांची मंगळवारी छाननी करण्यात आली आहे. छाननीत पात्र झालेल्या कामांना लवकरच कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. छाननी समितीत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, शहर अभियंता सुरेश इथापे यांचा समोवश होता.
...
मनपा कार्यालयातच गर्दी
अहमदनगर : महापालिकेने शहरात कठोर निर्बंध लागू केले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतच नियमांचे पालन होत नसून, गर्दी होत आहे. बुधवारी सफाई कामगारांची बैठक होती. या बैठकीसाठी आलेल्या कामगारांनीच आयुक्तांच्या दालनासमोर गर्दी केली होती.
...
स्थायी समितीची आज ऑनलाईन सभा
अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज, गुरुवारी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन होणार असून, या सभेत मोकाट कुत्रे, शहरातील गटारीच्या साफसफाईच्या निविदांवर चर्चा होणार आहे.