शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:06 IST

गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत.

राहुरी : गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. पुढील आठ दिवस पाऊस लांबल्याचे सांगण्यात येत असून जिल्ह्यात ७१ टक्के पेरण्या झालेल्या आहेत.पश्चिम बंगाल सागरात कमी दाबाचा पट्टा नसल्याने पाऊस रूसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. यंदाच्या पावसाळयात नगर जिल्ह्यात १९३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या उभ्या पिकांसाठी पावसाची गरज निर्माण झाली आहे. हवामानातील बदलामुळे पिकांच्या वाढीवर यंदा प्रतिकूल परिणाम झाला आहे. ऊस या पिकाचे गेल्या वर्षी एकरी उत्पादन वाढले होते. यंदा मात्र उसाची वाढ समाधानकारक नसल्याचे चित्र समोर आले आहे.पिकांवर रोगराई, किडींचा प्रादुर्भावढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशी या पिकावर फुलकिडे, मावा, पांढरी माशी व तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. नियंत्रणासाठी १५ गॅ्रम अ‍ॅसिफे ट व ३ मिली इमिडॅक्लोप्रीड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हातपंपाने फवारणी करावी, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सांगितले आहे. रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी मिश्र पीक, आंतरपीक, सापळा पिके म्हणून मका, चवळी, झेंडूची लागवड करण्याचा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहील़ किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील़ कमाल आर्द्रता ७९ ते ८७ टक्के राहील. किमान आर्द्रता ७१ ते ७५ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग १४ ते १९ किलोमीटर राहील.अशा परिस्थितीमुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. - डॉ. रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी