शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:28 IST

विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.

राहुरी : विदर्भ व मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे आगमन झाले आहे़ उकाडा असहाय झाला असून १० जूननंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिले आहेत.गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ सरासरी ९६ टक्के पाऊस होण्याची शक्यता शास्त्रज्ञ डॉ़ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. २९ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे़ अहमदनगर जिल्ह्यात आज ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़ शनिवारी जिल्ह्याचे तापमान नोंद ४१़६ सेल्सिअस होते़आज तापमान दीड अंश सेल्सिअसने घसरले आहे़ रात्रीचे तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे़ १० जूनच्या दरम्यान जिल्ह्यात पाऊस होणे अपेक्षित आहे. दोन चार दिवस पाऊस मागे पुढे होऊ शकतो.अहमदनगर जिल्ह्याची सरासरी ९६ टक्के इतकी आहे़ यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे़गेल्यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात केवळ २४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ म्हणजे गेल्या वर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडला होता़ त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती़ यंदा पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़बीटी कपाशीची लागवड २५ मे रोजी करण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे़ पाऊस पडल्यानंतर कपाशीची लागवड करावी़ मे महिन्यात कपाशीची लागवड केल्यास जमिनीत उष्णतेचे प्रमाण जास्त आहे़ त्यामुळे उगवण कमी होईल़ त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवडीचा निर्णय घ्यावा़ बागायती भागात जमीन ओलावून लागवड केली तरी तापमानाचा उगवण क्षमतेवर परिणाम होणार आहे़ -डॉ़ रवींद्र आंधळे, सहयोगी प्राध्यापक, हवामान विभाग, कृषी विद्यापीठयंदा उष्णतेची लाट आहे़ त्यामुळे मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड करणार आहे़ फार उशिरा लागवड केल्यास पुढील गव्हाचे पीक घेता येत नाही़ जूनमध्ये पहिल्या आठवड्यात पाऊस आल्यास कपाशीला फायदेशीर ठरेल़ मात्र पाऊस लांबल्याने कपाशी उत्पादकांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे़ -विलास वराळे, अध्यक्ष, मुळाथडी शेतकरी बचत गट

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी