शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:26 IST

जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यातील गावांना वादळी वा-यासह जोरदार पावसाने चांगलाच तडाखा दिला.

अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यातील गावांना वादळी वा-यासह जोरदार पावसाने चांगलाच तडाखा दिला. जामखेड शहरात एक महिला जखमी झाली. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले. कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील छावण्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मृग नक्षत्रातील पहिलाच पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.जामखेड शहर व तालुक्यात सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वादळी वाºयासह मृगाच्या पावसाने हजेरी लावली. वाºयामुळे शहर परिसरातील छावणीतील जनावरांचे छत उडून गेले. आरोळे झोपडपट्टी येथील घरावरील पत्रे उडून वृद्ध महिला जखमी झाली. घरातील संसारोपयोगी वस्तू व धान्य भिजले. सायंकाळी पाऊस आला त्यावेळी छगन निमोणकर व आशाबाई निमोणकर हे वयोवृद्ध दाम्पत्य घरातच होते. त्याच वेळी छतावरील पत्रे उडाले. त्यातील एक पत्रा आशाबाई यांना लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.अकोले तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाºयासह, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोले परिसरातील शेतशिवारात पाणीच पाणी साचले होते. संगमनेर तालुक्याचे पठारभागात बोटा व घारगाव परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस बरसला. दरम्यान मृग नक्षत्राला सुरवात झाली. यामध्ये पठारभागात हलका पाऊस झाला. आजही रविवारी नेहमीप्रमाणे तीव्र उष्णता जाणवत होती. दुपारनंतर वादळी वाºयांसह विजेच्या कडकडाट पावसाला सुरुवात झाली. बोटा परिसरात व लगतच्या गावांमध्ये हा पाऊस तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे़कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात मृग बरसला़ विजेच्या कडकडाटासह वादळी वारे तसेच गारांसह पावसाची हजेरी लावली. रविवारी सायंकाळी ७ वाजता मृगाचा एक तास वादळी वाºयासह पाऊस झाला.कोपरगाव परिसरातील वारी येथे विजांच्या कडकडाटांसह रात्री पाऊस सुरू होता. दहिगाव बोलका परिसरातही वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.शिर्डी शहर परिसरात सायंकाळी वादळी वाºयासह पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची चांगलीच धावपळ उडाली होती. अनेकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. काही महिलांनी पहिल्या पावसाचे पूजन केले.झाड कोसळलेअकोले/राजूर-तालुक्यातील बोटा, अकोले परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या वादळी पावसात बोटा-बेलापूर रोडवर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या फटका प्रवाशांना बसला. भंडारदरा परिसरातही रात्री विजेसह परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. राजूर परिसरातही एक तास हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. मृगाचा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अकोले, कळस परिसरात वादळी पावसाने मका भूईसपाट झाली आहे.वीज पडून बैल ठारघारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात भोजदरी येथे रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील शेतकरी गोरख सदू मते यांच्या गोठ्यातील बैलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. परिसरातही जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मृगाचा पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.राहुरी : शहर व तालुक्याच्या अनेक भागात वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विसापूरला बाजारकरूंची पळापळश्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे आलेल्या वादळी वाºयाने आठवडे बाजारातील ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसाने दुकानदारांची दुकाने आवरताना हाल झाले. यातही काहींचे मोठ्या नुकसानही झाले. विसापूरजवळच विजेचे खांब पडल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला. सुरेगाव, उखलगाव येथील छावण्यांची छते वादळाने उडाली. विसापूर येथील बलभीम शिंदे व आदिनाथ मोरे, गोरख जाधव यांच्या झोपड्यांचे वादळाने नुकसान झाले. पांढरेवाडी व वेठेकरवाडी येथे काही घरांवरील पत्रे उडून गेले.राशीनला विजांचा गडगडाटराशीन : कर्जत तालुक्यातील राशीनसह परिसरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासात सर्वत्र पाणीच पाणी केले. या पावसाने शेतकºयांना चांगला दिलासा दिला आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय