--------------
मोहरमनिमित्त भंडारा
अहमदनगर : मोहरमनिमित्त जुना बजार यंग पार्टीच्या वतीने बुधवारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरम साध्या पद्धतीने करण्यात येत आहे. इतर खर्चाला फाटा देत सर्व धर्मीयांसाठी या वर्षीही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. जेवणाची पंगत न करता भंडारा घरोघरी वाटप करण्यात आला. यावेळी यंग पार्टीचे नासीर खान, शाहनवाझ सय्यद, अरबाज सय्यद, विकार सय्यद, मतीन शेख, कैफ सय्यद, फईम शेख, सैफ सय्यद, साहिल शेख, आफताब शेख, शानू शेख, शकील शेख, अज्जू शेख, रेहान सय्यद, मोईन सय्यद, आयान शेख, पिनू घोरपडे, लक्ष्मण बारस्कर, फैजअली शेख, उस्मान सय्यद, नासीर खान, सोफियान सय्यद, सलमान सय्यद, आतिक तांबोली, अकील बागवान आदी उपस्थित होते.