शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आढावा बैठकीत पाणी, छावण्याच्या तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 17:54 IST

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कर्जत तालुका टंचाई आढावा बैठकीत पिण्याचे पाणी, टँकर व छावण्यांबाबत तक्रारींचा पाऊस पडला.

कर्जत : खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कर्जत तालुका टंचाई आढावा बैठकीत पिण्याचे पाणी, टँकर व छावण्यांबाबत तक्रारींचा पाऊस पडला.‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास लोकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागून अधिकारी व लोकांचा संपर्क वाढेल, असा सल्ला विखे यांनी यावेळी दिला. येत्या पाच वर्षांमध्ये आपण दक्षिणेतील कामकाजाची पद्धत बदलणार आहोत. प्रत्येक गावातील प्रलंबित प्रश्न मला लेखी स्वरूपात कळवा. ते कसे सुटतील? यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून ते सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली.या बैठकीत जनावरांच्या छावण्या, पाण्याचे टँकर, रोजगार हमी योजना, कर्जतचा पाणी व वीज प्रश्न, सामाजिक वनीकरण विभागाची कामे याबाबत चर्चा झाली. ८४ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पण मंजूर खेपा वेळेवर व नियमित होत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. भीमा नदीतील पाणी संपल्यामुळे कर्जत शहराला गेल्या पंचवीस दिवसांपासून पाणी नाही. कर्जतला पाणी पुरवठा करण्यासाठी १८ टँकर मंजूर केले आहेत. पण याचा ठेका दिलेल्या संस्थेकडे टँकरची टंचाई असल्यामुळे कर्जतला फक्त दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायती व विविध संस्थांनी घेतला आहे. मात्र सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.या बैठकीस नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, जिल्हाबँकेचे बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, पंचायत समितीच्या सभापती साधना कदम, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे, स्वप्निल देसाई. दादासाहेब सोनमाळी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे. राशीनचे उपसरपंच शंकरराव देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र कोठारी,डिकसळचे सरपंच अ‍ॅड. महेंद्र शिंदे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, शहराध्यक्ष सागर कांबळे. संतोष खळगे. नगरसेवक बापूराव नेटके, अनिल गदादे, सचिन सोनमाळी, हर्षदा काळदाते,निता कचरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.छावण्यांचे ३१ कोटी पडूनकर्जत तालुक्यात ९७ छावण्या सुरू आहेत. छावणी चालकांना होत असलेल्या त्रासाचा या बैठकीत उहापोह झाला. आॅनलाईन पद्धत, रोज बदलणारे नियम, बारकोड पद्धत, बिल मंजूर करण्यासाठी १० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लागणाºया स'ा पाच प्रकारचे आॅडिट, विविध प्रकारच्या तपासण्या या प्रकारांमुळे छावणी चालक वैतागले आहेत. बिले काढण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे कर्जत तालुक्यातील छावणी चालकांना बिलापोटी वाटप करण्यासाठी आलेले ३१ कोटी ५ लाख ४९ लाख रूपये टंचाई विभागाकडे पडून आहेत. ही बिले त्वरित अदा करण्याबाबत खा. विखे यांनी तहसील कार्यालयात एक स्वतंत्र टंचाई विभाग निर्माण करण्याच्या व छावणी चालकांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत