शहरातील राजवाडा परिसरात भाऊसाहेब विठ्ठल साळवे, अरुण श्यामराव साळवे हे राहत्या घराच्या आडोशाला दारू तयार करताना व विक्री करताना दिसून आले. यामध्ये गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, दारूचे ड्रम, नवसागर असा एकूण एक लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी भाऊसाहेब विठ्ठल साळवे, अरुण श्यामराव साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित जाधव, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, संजय दरंदले, राहुल सोळुंके, शिवाजी ढाकणे, चंद्रकांत कुसळकर, अजिनाथ पाखरे, सचिन ताजणेे, बनसोडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
290721\img-20210728-wa0217.jpg
राहुरी शहरातील हातभट्टी दारूअड्डे पो.नि.दुधाळ अन् स्थानिक गुन्हे शाखेने केले उध्वस्त